ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
डाॅक्टर सिद्धेश सकपाळ यांच्या हार्मनी मेडिकेअर हाॅस्पिटलमधील मधूमेह तपासणी शिबीराला उत्स्फूर्त प्रतिसाद..!

डाॅक्टर सिद्धेश सकपाळ यांच्या हार्मनी मेडिकेअर हाॅस्पिटलमधील मधूमेह तपासणी शिबीराला उत्स्फूर्त प्रतिसाद..!

प्रकाशन: 01 Dec 2021 12:45 PM
वाचन संख्या 98

आचरा | अनिकेत पांगे : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आचरा जवळील त्रिंबक येथे डॉ सिद्धेश सकपाळ यांच्या हार्मोनि मेडिकेअर रुग्णालयात काल सकाळच्या सत्रात रोजी पार पडलेल्या मोफत मधुमेह तपासणी शिबिराला रुग्णांचा चांगला प्रतिसाद मिळाला.
सदर शिबिरात 51रुग्णांनी सहभाग दर्शवला. या शिबिरात रक्तातील मधुमेह तपासणी, त्यावरील घ्यावयाची काळजी, आहार, व्यायाम या संदर्भात डॉ सिद्धेश सकपाळ यांनी व्यवस्थित मार्गदर्शन केले.
त्याशिवाय मधुमेही रुग्णांमध्ये हातापायात होणाऱ्या वेदना, जळजळ, पायातील रक्ताभिसरण नीट होते का हे पडताळून पाहण्यासाठी मशीनद्वारे पायांची तपासणी करण्यात आली.”शिबिरात नवीन 6 रुग्णांना मधुमेह बाधा असल्याचे लक्षात आले, डॉक्टर आणि सहकाऱ्यांनी त्यांनाही व्यवस्थित मार्गदर्शन केले. मोफत औषधांचेही वाटप सर्व रुग्णांना केले गेले. कोरोना काळात सुद्धा डॉ सिद्धेश सकपाळ यांनी त्रिंबक दशक्रोशीत केलेलं कार्य प्रशंसनीय आहे. कित्येक हजारो रुग्णांना यशस्वी उपचार आणि मार्गदर्शन त्यांनी पहिल्या आणि दुसऱ्या कोविड लाटेत केले आहेत. कुटुंबातील जेष्ठानी चालवलेला समाजसेवेचा वारसा आपणही पुढे आरोग्यसेवेतून करत आहोत”, असे त्यांनी या प्रसंगी सांगितले. या शिबिराला डॉ. सिद्धेश सकपाळ यांच्यासोबत त्यांचे सहकारी जयदीप कांबळे, रुंजी नाईक, काजल घाडीगांवकर, अनिकेत पांगे, आकाश मेस्त्री यांचे साहाय्य फार मोलाचे ठरले. आचरा ,त्रिंबक परिसरातील सर्वांनी आणि शिबिरातील तपासणीस आलेल्या मधुमेह संबंधीत व्यक्तींनी या प्रकल्पाबाबत समाधान व्यक्त केले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स