ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
कणकवली तालुका प्रवासी संघ संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न्न.

कणकवली तालुका प्रवासी संघ संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न्न.

प्रकाशन: 30 Nov 2021 03:32 PM
वाचन संख्या 45

संस्थेच्या दिवंगत सदस्यांना वाहिली गेली श्रद्धांजली..

कणकवली / उमेश परब (सिंधुदुर्ग ब्युरोचीफ): एसटी कर्मचार्‍यांनी आपल्या न्याय हक्कासाठी लढा उभारला असून आता शासनानेही त्या लढ्यास न्याय देण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. एसटी कोकणवासीयांची जीवनवाहिनी आहे. त्यामुळे एसटी कर्मचार्‍यांनीही आता तुटेल एवढे न ताणता आपली व प्रवाशांची काळजी घ्यावी, अशी अपेक्षा तालुका प्रवासी संघाच्यावतीने करण्यात आली.
कणकवली तालुका प्रवासी संघ संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच येथील ज्येष्ठ नागरीक विरुंगळा केंद्र येथे पार पडली. याप्रसंगी अध्यक्ष मनोहर पालयेकर, उपाध्यक्ष रमेश जोगळे, सचिव सौ. श्रद्धा कदम, सीताराम उर्फ दादा कुडतरकर, रविंद्र मुसळे, राजाराम परब, पिलाजी कांबळे, सूर्यकांत राणे, सुरेश पाटकर आदींसह सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
एसटी कर्मचारी खर्‍या अर्थाने जनतेचे सेवक आहेत. गेले काही दिवस सुरु असलेल्या संपामुळे प्रवासी जनतेचीही गैरसोय होत आहे. बहुजन हिताय बहुजन सुखाय या ब्रिदवाक्याचा अर्थ लक्षात घेऊन कोकणातील ग्रामीण भागातील प्रवासी जनतेची गैरसोय कर्मचार्‍यांनी दूर करावी. त्यांच्या लढ्याला प्रवासी जनतेचे आशिर्वादही निश्‍चित मिळतील, अशी अपेक्षा यावेळी करण्यात आली.
सभेत विविध ठरावही संमत करण्यात आले. महामार्गावरील निवारा शेडनजीक तसेच मुतार्‍या तसेच कणकवली शहरात आठवडा बाजारादिवशी फिरत्या शौचालयांची सोय उपलब्ध करावी, अशी मागणी करण्याचे ठरविण्यात आले. डिसेंबर महिन्यात रोटरी क्लब व ज्येष्ठ नागरीक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने नेत्र तपासणी शिबिर घेण्याचे ठरविण्यात आले. ग्रामिण रुग्णालयातील आवश्यक पण, बंद असलेल्या मशिनरी सुरु करून त्यासाठी तंत्रज्ञ उपलब्ध व्हावेत. ज्येष्ठ नागरिकांसाठी रेल्वे प्रवासामध्ये सवलत मिळावी. एसटीने महामंडळानेही ज्येष्ठ नागरीक व प्रवासी जनतेच्या गैरसोयीकडे लक्ष द्यावे, असे सुचविण्यात आले.
गेल्या काही वर्षांत तालुका प्रवासी संघाने राबविलेले उपक्रम स्तुत्य असून भविष्यात राबविण्यात येणार्‍या उपक्रमांचा आढावा वाढविण्यासाठी क्रियाशील सभासदांची गरज आहे. कणकवली तालुक्यातील सामाजिक बांधिलकीने काम करू इच्छिणार्‍या कार्यकर्त्यांनी संघाचे सभासद व्हावे. अधिक माहितीसाठी (9421235589) येथे संपर्क करण्याचे आवाहन पालयेकर यांनी केले. या सभेत सुरुवातीला शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, प्रवासी संघाचे माजी उपाध्यक्ष वाय. पी. राणे, माजी खजिनदार मारूती जाधव, सभासद विजय गोखले यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स