ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
असलदे येथील 'श्री रामेश्वर विकास सोसायटी संचालक मंडळाची निवडणुक'  बिनविरोध…!

असलदे येथील 'श्री रामेश्वर विकास सोसायटी संचालक मंडळाची निवडणुक' बिनविरोध…!

प्रकाशन: 30 Nov 2021 01:52 PM
वाचन संख्या 89

१३ जागांवर उमेदवारांची निवड करुन गावातील सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी संस्थेच्या हितासाठी घेतला निर्णय…

कणकवली | उमेश परब (सिंधुदुर्ग ब्युरोचीफ) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ‘श्री. रामेश्वर विविध कार्यकारी सेवा सोसायटी मर्यादीत,असलदे’, या संस्थेचा पंचवार्षिक निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे.त्यानुसार गावातील सर्वच राजकीय व सामाजिक कार्यकर्त्यांनी पुढाकार घेत ही निवडणूक बिनविरोध करण्याचा एकमुखी निर्णय घेतला.त्यानुसार १३ जागांसाठी १३ उमेदवारी अर्ज प्राप्त झाले होते. त्यावर सोमवारी छाननी झाल्याने संचालक मंडळ निवडणुक बिनविरोध झाली आहे.
संचालक मंडळामध्ये-सर्वसाधारण कर्जदार खातेदार प्रतिनिधी- भगवान लोके(पत्रकार), दयानंद हडकर, दिनकर दळवी, विठ्ठल खरात, उदय परब, शामराव परब, संतोष परब, परशुराम परब या आठ जणांचे उमेदवार अर्ज दाखल करण्यात आले.
तर महिला प्रतिनिधी – कांचन लोके, सुनिता नरे,इतर मागास प्रवर्ग – शत्रुघ्न डामरे,अनु. जाती / जमाती प्रतिनिधी) – अनंत सखाराम तांबे,भटक्या विमुक्त जाती / जमाती प्रतिनिधी – प्रकाश विठू खरात आदी १३ जागांसाठी १३ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते, त्यावर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी छाननी करीत हे अर्ज वैध ठरवले आहेत.
यावेळी असलदे सरपंच पंढरी वायंगणकर, सोसायटी चेअरमन प्रकाश परब, माजी सरपंच लक्ष्मण लोके, रघुनाथ लोके, सुरेश मेस्त्री, महेश लोके, विजय आचरेकर, अनिल कोठारकर, सचिन लोके,संतोष घाडी, विजय डामरे आदींसह असलदे गावातील ग्रामस्थ व शेतकरी सभासद उपस्थित होते.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स