ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
रेडकर हाॅस्पिटल रिसर्च सेंटर रेडी येथील 'विसावा' प्रकल्पाच्या नूतन वास्तूचा उद्घाटन सोहळा संपन्न..!

रेडकर हाॅस्पिटल रिसर्च सेंटर रेडी येथील 'विसावा' प्रकल्पाच्या नूतन वास्तूचा उद्घाटन सोहळा संपन्न..!

प्रकाशन: 29 Nov 2021 12:56 PM
वाचन संख्या 106

रमाबाई नारायण प्रभूझांटये चॅरिटेबल ट्रस्टतर्फे देणगीतून उभारलेली समाजोपयोगी प्रकल्प.

रेडी | सुयोग पंडित : आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डाॅक्टर विवेक रेडकर व रमाबाई नारायण चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या माध्यमातून समाजासाठी अथक कार्यरत रहाणार्‍या विसावा प्रकल्पाच्या नूतन वास्तूचे उद्घाटन रेडी येथे झाले आहे.
डाॅक्टर रेडकर हाॅस्पिटल रिसर्च सेंटर, रेडी येथील या सोहळ्यात स्वतः डाॅक्टर विवेक रेडकर, रमाबाई नारायण चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष श्री सुरेश झांटये हे प्रमुख उपस्थित होते.
यावेळी डाॅक्टर सीमाली रेडकर,जि.प.चे नितेश राऊळ यांनीही आपले विचार व मनोगत व्यक्त केले.अनेक मान्यवर, प्रभूझांटये कुटुंबिय आणि रेडकर हाॅस्पिटल रिसर्च सेंटरशी संलग्न असे सर्वजण उपस्थित होते.
विसावा प्रकल्पाअंतर्गत ज्या व्यक्तींचे उपचार तथा देखभाल त्यांच्या नातेवाईक व आप्तेष्टांकडून शक्य नाही अशांसाठी उपचार घेऊन रहाण्याची व दीर्घकालीन उपचार वास्तव्याची सेवा दिली जाणार आहे .
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.रविकिरण तोरसकर यांनी केले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स