ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
जानवलीतील अपघातात वरवडे प्राथ.आरोग्य केंद्रातील फार्मासिस्ट गजानन शेट्ये जागीच मृत ;अज्ञात कार चालक फरार

जानवलीतील अपघातात वरवडे प्राथ.आरोग्य केंद्रातील फार्मासिस्ट गजानन शेट्ये जागीच मृत ;अज्ञात कार चालक फरार

प्रकाशन: 29 Nov 2021 12:26 PM
वाचन संख्या 119

कणकवली | उमेश परब (सिंधुदुर्ग ब्युरोचीफ ): मुंबई गोवा महामार्गावर जानवली येथे अज्ञात कारने मागून दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार गजानन केशव शेट्ये ( सध्या रा. जानवली वाकाडवाडी , मूळ रा.तोंडवली, कणकवली ) यांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात 28 नोव्हेंबर रोजी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास जानवली टिव्हीएस शोरूम नजीक घडला.गजानन शेट्ये हे आपल्या ताब्यातील ऍक्टिव्हा क्र. MH -07 -Y – 8488 घेऊन कणकवलीच्या दिशेने येत होते.त्याचवेळी कणकवली च्या दिशेने जाणाऱ्या अज्ञात कारचलाकाने मागून शेट्ये यांच्या ऍक्टिव्हाला धडक देऊन कारचालक कारसह पसार झाला. अपघाताचा मोठा आवाज ऐकून रस्त्यावर फेरफटका मारणारे दामोदर आबाजी सावंत ( रा.जानवली, डोंगरेवाडी ) यांनी लागलीच अपघातस्थळी धाव घेतली. त्यांच्यासोबत जानवली सरपंच शुभदा रावराणे, पोलिस पाटील मोहन सावंत,तुकाराम तावडे, आशिष राणे यांनीही घटनास्थळी धाव घेतली. दामोदर सावंत यांनी तात्काळ ऍम्ब्युलन्स मागवून अपघातग्रस्त शेट्ये याना कणकवली उपजिल्हा रुग्णालयात हलवले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासले असता हॉस्पिटलमध्ये पोचण्यापूर्वीच शेट्ये यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले. दरम्यान अपघात घडल्यानंतर अज्ञात कारचालकाने कारसह अपघात स्थळावरून पलायन केले असले तरी ती टिव्हीएस शोरूम च्या सीसीटीव्ही मध्ये अपघाताची घटना रेकॉर्ड झाल्याची दाट शक्यता आहे. पोलिसांनी ते सीसीटीव्ही फुटेज तपासून त्या कारचा शोध घेणे गरजेचे आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स