सी.आर.चव्हाण यांची जिल्हा चर्मकार समाज उन्नती मंडळाच्या जिल्हा संघटकपदी नियुक्ती..
कणकवली | उमेश परब (सिंधुदुर्ग ब्युरोचीफ ) : सिंधुदुर्ग जिल्हा चर्मकार समाज उन्नती मंडळाच्या जिल्हा संघटक पदी सामाजिक कार्यकर्ते श्री.चंद्रकांत रामचंद्र तथा सी.आर.चव्हाण यांची नियुक्ती जिल्हाध्यक्ष सुजित जाधव यांनी आज जाहीर केली.
सिंधुदुर्गनगरी येथे आज संपन्न झालेल्या जिल्हा कार्यकारिणी सभेत सर्वानुमते श्री.सी.आर.चव्हाण यांची जिल्हा संघटक पदी नियुक्ती करण्यात आली. श्री.सी.आर.चव्हाण हे सामाजिक कार्यात अग्रेसर आहेत.त्यांच्या अभ्यासू कार्याची दखल घेऊन त्यांना जिल्हा कार्यकारिणीवर संधी देण्यात आल्याचे जिल्हाध्यक्ष सुजित जाधव यांनी सांगितले.यावेळी श्री.चव्हाण यांना नियुक्ती पत्र देऊन सन्मानित करण्यात आले.यावेळी जिल्हाध्यक्ष सुजित जाधव,जिल्हासरचिटणीस चंद्रसेन पाताडे,जिल्हा कोषाध्यक्ष नामदेव जाधव,उपाध्यक्ष सुरेश पवार,सहसचिव अनिल चव्हाण,भवन समिती प्रमुख श्रीराम चव्हाण,कार्यवाह उदय शिरोडकर,सावंतवाडी तालुकाध्यक्ष दिलीप इन्सुलकर,सचिव जगदीश चव्हाण,कुडाळ तालुकाध्यक्ष रामदास चव्हाण,सचिव सुभाष बांबूळकर आदी उपस्थित होते.
श्री.सी.आर.चव्हाण यांचे या निवडीबद्दल जिल्हाभरातून अभिनंदन होत आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)