ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
खुल्या राज्यस्तरीय ऑनलाईन दशावतार स्पर्धेच्या सागरात कु.वैभवी पेडणेकर रुपी रत्नाची झळाळी..!

खुल्या राज्यस्तरीय ऑनलाईन दशावतार स्पर्धेच्या सागरात कु.वैभवी पेडणेकर रुपी रत्नाची झळाळी..!

प्रकाशन: 27 Nov 2021 11:17 PM
वाचन संख्या 178

मालवण | सुयोग पंडित : गेल्याच महिन्यात मसुरे येथील कुमारी वैभवी पेडणेकर हिने तिच्या महिनाखर्च तथा पाॅकेटमनीतून तिच्या प्राथमिक शाळेत जात साजरा केलेला  वाढदिवस एक “वैभवशाली बालपण” कसे मिळवावे याचा पाठ सर्वांना देऊन गेलेला होताच .कुडाळ महाविद्यालयातील या विद्यार्थिनीला आता आणखी एका क्षेत्रात सहभागी होताना पाहून तिच्यातील अष्टपैलुत्वाचीही चुणूक आता दिसलेली आहे.
बॅरिस्टर नाथ पै सेवांगण या सुप्रसिद्ध सामाजीक संस्थेतर्फे खुल्या व राज्यस्तरीय ऑनलाईन दशावतार स्पर्धेचे आयोजन केले गेले होते.                 वैभवी पेडणेकर हिने या स्पर्धेत कोळी हे विनोदी पुरुषपात्र साकारले होते.
या राज्यस्तरीय स्पर्धेत तिच्या भूमिकेला सर्वांनीच उत्तम पसंद केले होते.
तज्ञ परिक्षकांनाही तिची भूमिका पाहून तिला राज्यस्तरीय स्पर्धेत उत्तेजनार्थ क्रमांक घोषित केला आहे. दिनांक पंचवीस नोव्हेंबर रोजी तिला त्याविषयीचे उत्तेजनार्थ क्रमांक प्रशस्तीपत्र वितरीत झाले आहे.
अत्यंत चुरशीच्या या स्पर्धेतील नवोदीत वैभवी पेडणेकर हिचे यश नक्कीच मसुरेवासियांना आणि कुडाळ महाविद्यालयालाही आनंद देणारे ठरले आहे . वैभवीच्या या यशाबद्दल वैभवीसोबत तिचे शिक्षक,प्राध्यापक, पालक तथा मसुरेतील झुंजार व दत्तप्रसाद पेडणेकर या समाजशील कुटुंबियांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. श्री.दत्तप्रसाद पेडणेकर हे वैभवीचे वडिल असून त्यांचा सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमातील सहभाग हा वैभवीला उत्तम प्रेणादायक ठरला आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स