ताज्या बातम्या
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप.
वागदे ग्रामसेवकांची बदली रद्द व्हावी अशी मागणी...!

वागदे ग्रामसेवकांची बदली रद्द व्हावी अशी मागणी...!

प्रकाशन: 09 Aug 2021 04:59 PM
वाचन संख्या 79

कणकवली / उमेश परब : वागदे येथील ग्रामसेवक ऋतुराज कदम यांच्याकडून विनंती बदलीचा अर्ज घेऊन त्यांची बदली करण्यात आली. नियमानुसार ते बदलीस पात्र नसताना करण्यात आलेली ही बदली रद्द करण्यात यावी, तसेच त्यांना वागदे येथे तात्काळ रुजू करण्यात यावे, अशी मागणी वागदे सरपंच, उपसरपंचसहित ग्रामस्थांनी गटविकास अधिकाऱ्यांची भेट घेऊन केली.
वागदे सरपंच पूजा घाडीगावकर, उपसरपंच रुपेश आमडोस्कर, माजी उपसरपंच संतोष गावडे, रवींद्र गावडे शिशिर घाडीगावकर, ललित घाडीगावकर, पंढरीनाथ कदम, सुषमा गोसावी, शरद सरंगले, अमित घाडीगावकर, गणपत घाडीगावकर दीपक गोसावी, मंगेश घाडीगावकर, संदीप घाडीगावकर व इतर उपस्थित होते.
वागदे ग्रामसेवकांची बदली करताना तेथील पदभार लगतच्या ग्रामसेवक न देता कुंभवडे ग्रामसेवक यांच्याकडे देण्यात आला. वास्तविक वागदे ग्रामसेवक बदलीसाठी अद्याप प्रशासकीय दृष्ट्या पात्र नव्हते. मात्र त्यांच्याकडून बदली अर्ज घेऊन ही बदली करण्यात आली आहे. त्यामुळे ती तात्काळ रद्द करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. याप्रकरणी वरिष्ठांकडे कळवून उचित कार्यवाही केली जाईल असे गटविकास अधिकाऱ्यांनी सांगितले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स