ताज्या बातम्या
महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान. साहित्यिक दीपक पटेकर यांना मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान, मुंबईचा सर्वोत्कृष्ट गद्य स्तंभलेखन पुरस्कार प्रदान. मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम २६ ऑक्टोबर रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर.
कणकवली तालुका सरपंच संघटनेचे शासनाकडे निवेदन...
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

कणकवली तालुका सरपंच संघटनेचे शासनाकडे निवेदन...

प्रकाशन: 09 Aug 2021 04:53 PM
वाचन संख्या 55

कणकवली / उमेश परब : ग्रामपंचायतीनी पथदिवे व पाणीपुरवठा योजनांची बिले भरावीत. तसेच जीएसटीची रक्कमही दरमहा भरण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. महावितरणची बिले न भरल्यास सरपंच व ग्रामसेवकांवर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. मात्र शासनाने http://localhost/news/public/uploads/2018 पर्यंतच्या पथदिव्यांच्या बिलांचा हिशोब दिलेला नाही. ग्रामस्तरावर काम झालेले नसताना जीएसटीची रक्कम का भरावी? जोपर्यंत याबाबतचा हिशोब मिळत नाही तोपर्यंत ही बिले व जीएसटी भरणार नाही. शासनाची अशीच भूमिका असेल तर ग्रामपंचायतीही शासनाने चालवाव्यात असा इशारा तालुका सरपंच संघटनेच्यावतीने देण्यात आला.
तालुका सरपंच संघटनेच्यावतीने गटविकास अधिकारी अरुण चव्हाण यांची भेट घेऊन चर्चा करण्यात आली. यावेळी विस्तार अधिकारी सूर्यकांत वारंग उपस्थित होते. सरपंच संघटनेचे सरपंच ओटव हेमंत परुळेकर, वाघेरी सरपंच संतोष राणे, असलदे सरपंच पंढरी वायंगणकर, पिसेकामते सरपंच सुहास राणे, कळसुली सरपंच साक्षी परब, नांदगाव सरपंच अफ्रोजा नावलेकर, कोळोशी सरपंच ऋतिका सावंत, साकेडी सरपंच रीना राणे, डांबरे सरपंच सुजाता जाधव, शिवडाव सरपंच श्रीमती जाधव, कसरल सरपंच गुरुनाथ चव्हाण, आयनल सरपंच बापू फाटक, करंजे सरपंच मंगेश तळगावकर आदी उपस्थित होते.
यावेळी पथदिव्यांची रक्कम भरण्याबाबत शासनाने काढलेल्या पत्राबाबत सरपंच संघटनेने तीव्र नाराजी व्यक्त केली. आज स्वनिधीतून रक्कम भरण्यासाठी ग्रामपंचायती सक्षम नाहीत. तसेच केंद्र शासनाचा निधी आराखडा तयार झाल्यानंतर अशा कामासाठी भरणे ग्रामसभेची मान्यता घेतल्याशिवाय उचित ठरणार नाही. कामे न झालेली असताना जीएसटी रक्कम का भरायची असा सवाल करत याबाबत ग्रामविकास मंत्री यांनाही निवेदन देण्यात येणार असल्याचे सरपंच संघटनेच्यावतीने स्पष्ट करण्यात आले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स