ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
मालोंड वासियांची मागणी आमदार वैभव नाईक यांनी केली पूर्ण.

मालोंड वासियांची मागणी आमदार वैभव नाईक यांनी केली पूर्ण.

प्रकाशन: 27 Nov 2021 11:02 AM
वाचन संख्या 60

मालोंड गडनदी तर जेटीसाठी २५ लाखाचा निधी मंजूर

खा. विनायक राऊत व आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते झाले भूमिपूजन

पोईप | ओंकार चव्हाण : सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेली अनेक वर्षे सातत्याने मागणी होत असलेल्या मालोंड गडनदी तर जेटीचा प्रश्न मार्गी लागला आहे. कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांच्या प्रयत्नातून या जेटीसाठी महाराष्ट्र सागरी मंडळ अंतर्गत २५ लाख निधी मंजूर करण्यात आला आहे. त्याचबरोबर विरण ते मालोंड हा रस्ता चार किलोमीटरचा असून या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत ३ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आज या दोन्ही कामांची भूमिपूजने खा. विनायक राऊत, आ.वैभव नाईक यांच्या हस्ते पार पडली. मालोंड गडनदी तर जेटीमुळे मालडी, विरण, मालोंड, मसदे, आडवली, चुनवरे, श्रावण, पळसंब या गावांना याचा लाभ होणार आहे. मालोंड येथील नागरिकांना मालडी,आडवली गावांमध्ये बोटीद्वारे प्रवासाचा मार्ग सुखकर होणार आहे. तसेच पर्यटन व रोजगाराच्या संधी देखील उपलब्ध होणार आहे.
जेटी होण्यासाठी तरुण उत्कर्ष मंडळ मुंबईचे अध्यक्ष जयवंत पांजरी, सचिव अनिल परब, कमलाकर सुर्वे, बाळा सुर्वे, फतू घाडीगांवकर, गोविंद वाडकर, बाळा परब, सुभाष परब, पांडुरंग तांडेल, शाखा प्रमुख समीर घाडीगांवकर, सुरभा पुजारे, बाळा पारकर, संतोष घाडीगांवकर, नवनाथ घाडीगांवकर यांनी आ.वैभव नाईक यांच्याकडे पाठपुरावा केला होता. महाराष्ट्र सागरी मंडळाचे सचिन गायकवाड यांनीही यासाठी सहकार्य केले.
मालोंड गावाला भरघोस निधी देत प्रमुख समस्या मार्गी लावल्याबद्दल तरुण उत्कर्ष मंडळ मुंबई व स्थानिक ग्रामस्थांनी समाधान व्यक्त करत खा. विनायक राऊत व आ. वैभव नाईक यांचा यावेळी सत्कार करत त्यांचे आभार मानले. यावेळी जी.प. गटनेते नागेंद्र परब, उपजिल्हाप्रमुख बबन शिंदे, तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, संग्राम प्रभुगांवकर, छोटू ठाकूर, नाना नेरूरकर, पंकज वर्दम,विजय पालव, बंडु चव्हाण, अमित भोगले, राहुल परब, सोमनाथ माळकर, पराग नार्वेकर, किरण प्रभू, सुभाष धुरी, मोहन घाडीगावकर, श्री. मिठबावकर, अरुण भोगले, भाऊ चव्हाण, मालोंड येथील सरपंच वैशाल घाडीगांवकर, नवनाथ घाडीगावकर, बाळा परब, कमलाकर सुर्वे, गोविंद वाडकर, अनिल परब, मकरंद तांडेल, सुवास सुर्वे, सुभाष परब, पांडुरंग तांडेल, जयवंत पारकर, नवनाथ घाडीगावकर, बाबा गावकर, महाराष्ट्र सागरी मंडळाचे सचिन गायकवाड, रस्ता ठेकेदार आशिष परब, जेटी ठेकेदार विनोद कन्स्ट्रक्शन आणि इतर अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.

        

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स