ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
कायदा व सुव्यवस्था हे पोलिसांचे काम आहे परंतु तो बिघडू न देणे ही सामान्य नागरिकांची जबाबदारी : कणकवली पोलिस निरीक्षक सचिन हुंदळेकर.

कायदा व सुव्यवस्था हे पोलिसांचे काम आहे परंतु तो बिघडू न देणे ही सामान्य नागरिकांची जबाबदारी : कणकवली पोलिस निरीक्षक सचिन हुंदळेकर.

प्रकाशन: 27 Nov 2021 11:17 AM
वाचन संख्या 54

कणवलीतील 26/11 दिनाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या शहीद पोलिस व नागरीकांसाठी श्रद्धांजली कार्यक्रमात मांडले विचार..

कणकवली | उमेश परब (सिंधुदुर्ग ब्युरोचीफ): सामाजिक कायदा व सुव्यवस्था राखणे हे पोलिसांचे काम आहे पण ती बिघडू न देणे ही नागरिकांची तेवढीच जबाबदारी आहे. सर्वसामान्य नागरिकांच्या मनात आजही पोलिसांबद्दल भीती आहे. ही भीती दूर करण्याचे आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करीत आहोत. तसेच संविधानामुळे आपला देश एकसंध आहे, असे प्रतिपादन कणकवलीचे पोलीस निरीक्षक सचिन हुंदळेकर यांनी केले.
26/11 रोजी मुंबईवर दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात शहीद झालेल्या पोलिसांना व नागरिकांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आम्ही कणकवलीतर्फे कणकवली पोलीस स्थानक परिसरात मेणबत्ती प्रज्वलित करण्यात कार्यक्रम आयोजित केला होता. या प्रसंगी ते बोलत होते.
यावेळी आम्ही कणकवलीचे अशोक कंरबेळकर, कलमठ ग्रामपंचायतीचे सदस्य तथा सामाजिक कार्यकर्ते विनायक उर्फ बाळू मेस्त्री, ज्येष्ठ नागरिक सेवा संघाचे दादा कुडतरकर, गोपुरी आश्रमचे अध्यक्ष प्रा. राजेंद्र मुंबरकर, अभिनेते नीलेश पवार, संजय मालंडकर, डॉ. सुहास पावसकर, रुपेश खाडये, विलास गुडेकर, संतोष कांबळे, ज्येष्ठ पत्रकार विजय गावकर, राज राजाध्यक्ष, महेश कोदे, दादा कोरडे, भाई चव्हाण, परेश परुळेकर,रोहन कदम, अर्पिता मुंबरकर, गौरी कामत, सुप्रिया पाटील, ज्योतिका हरियाण, दुर्वा मानकर, स्वरर्गा खांडेकर यांच्यासह पोलीस कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी उपस्थित नागरिकांपैकी काही नागरिकांनी आपली मनोगते व्यक्त करून शहीद झालेल्यांना आदरांजली वाहिली.                                 निलेश पवार यांनी आपले मनोगत व्यक्त करताना उपस्थितांनी संविधानाचे महत्त्व उपस्थितांना सांगून 26/11 हल्ल्यात शहीद झालेल्यांना त्यांनी आदरांजली वाहिली. यावेळी अर्पिता मुंबरकर यांनी संंविधान दिनानिमित्त घोषणा दिल्या. तत्पूर्वी 26/11 हल्ल्यात शहीद झालेल्यांना नागरिकांनी व ‘आम्ही कणकवली’च्या पदाधिकारी व सदस्यांनी मेणबत्ती प्रज्वलित करून श्रद्धांजली वाहिली.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स