ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
रस्ते चांगले असतील तर विकासकामांना गती मिळेलच : आमदार वैभव नाईक

रस्ते चांगले असतील तर विकासकामांना गती मिळेलच : आमदार वैभव नाईक

प्रकाशन: 26 Nov 2021 10:39 PM
वाचन संख्या 159

आचरा, वायंगणी, मालोंड,विरण येथील  १२ कोटींच्या निधीच्या विविध विकास कामांची  भूमिपूजने

कोरोना व अतीवृष्टीमुळे प्रलंबित असलेली कामे आता मार्गी लागणार असल्याचेही केले जाहीर..

चिंदर | विवेक परब : खासदार  विनायक राऊत, पालकमंत्री उदय सामंत,आमदार वैभव नाईक यांनी  मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्याकडे केलेल्या पाठपुराव्यामुळे  मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत आचरा गणपती मंदिर-रामेश्वर मंदिर-डोंगरेवाडी ते पारवाडी रस्त्यासाठी ३ कोटी ३५ निधी मंजूर झाला आहे. तर वायंगणी बौद्धवाडी सापळेबाग ते तोंडवळी रस्त्यासाठी ४ कोटी ७२ लाख व मालोंड विरण रस्त्यासाठी  ३ कोटी  व मालोंड गडनदी तर  जेटीसाठी २५ लाख  निधी मंजूर  करण्यात आला आहे.  त्याचबरॊबर बजेट अंतर्गत विरण पोईप येथे काँक्रेट गटारासाठी ४९ लाख निधी मंजूर  करण्यात आला आहे. या कामांचे भूमिपूजन आज खासदार विनायक राऊत व आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते करण्यात आले. कोरोनाच्या कालावधीत निधीची कमतरता असताना  देखील आम.वैभव नाईक यांनी मुख्यमंत्र्यांकडे सातत्याने पाठपुरावा करून मतदारसंघातील कामे मंजूर करून घेतली याबद्दल आम. नाईक यांचे  खासदार विनायक राऊत यांनी याप्रसंगी कौतुक केले. मालवण मधील विकास कामांसाठी निधीची कमतरता भासणार नाही. लागेल तेवढा निधी आम्ही सर्व  लोकप्रतिनिधी  उपलब्ध करून देऊ. येणाऱ्या निवडणुकांमध्ये नागरिकांनी शिवसेनेच्या पाठीशी खंबीर राहून  शिवसेना उमेदवारांना विजयी करावे असे आवाहन खासदार विनायक राऊत यांनी केले.
आमदार वैभव नाईक यांच्या म्हणण्यानुसार रस्ते चांगले असतील तरच त्या त्या भागातील विकासाला गती मिळते. अतिवृष्टीमुळे  जे जे रस्ते खराब झाले त्यांच्या दुरुस्ती साठी निधी मंजूर केला आहे. कोरोनामुळे रस्त्यांच्या दुरुस्तीचे काम थांबले होते. मात्र आता रस्ता  दुरुस्तीला सुरुवात करण्यात येत आहे. ज्या ठेकेदारांना रस्त्यांची व इतर  कामे मिळाली आहेत त्यांनी ती कामे दर्जेदार करावीत. नागरिकांनी देखील या कामांवर लक्ष ठेवावे. येणाऱ्या काळात मुख्यमंत्र्यांच्या तसेच सरकारच्या माध्यमातून मतदारसंघासाठी आणखी निधी आणला जाईल. शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारी कार्यकर्ते देखील विकास कामांसाठी पाठपुरावा करत आहेत. असे सांगितले.याप्रसंगी मालोंड येथे जि.प. गटनेते नागेंद्र परब,  उपजिल्हाप्रमुख बबन शिंदे, तालुकाप्रमुख हरी खोबरेकर,  माजी जि. प. अध्यक्ष संग्राम प्रभुगांवकर,पोईप विभागप्रमुख विजय पालव,  सरपंच वैशाली घाडीगावकर,  छोटू ठाकूर, पंकज वर्दम,अमित भोगले, भाऊ चव्हाण, राजेश गांवकर, समीर हडकर, आशिष परब, बंडू चव्हाण,  पराग नार्वेकर, किरण प्रभू, नाना नेरकर, बाळा परब, गोविंद  परब,कमलाकर सुर्वे,सुहास सुर्वे, मकरंद तांडेल, भाऊ घाडीगावकर, दिनकर जोशी, दीपिका मेस्त्री, बाळा पारकर, पद्माकर फणसगावकर, सुभाष परब, पांडुरंग तांडेल आदी. आचरा येथे विभाग प्रमुख समीर लब्दे, जगदीश पांगे, आबा दुखंडे,पंचायत  समिती सदस्या निधी मुणगेकर, श्रीकांत सांबारी भाऊ परब, ग्रा. प. सदस्या अनुष्का गावकर,मंगेश गावकर,  राजन गावकर, रवी गुरव, पांडू वायंगणकर, सुभाष धुरी, गणेश तोंडवळकर, नितीन घाडी, आबा खोत, राजन पांगे, बाबा सावंत, आबा वायंगणकर आदी
वायंगणी येथे तोंडवली सरपंच आबा कांदळकर, वायंगणी सरपंच संजीवनी रेडकर, माजी विभागप्रमुख उदय दुखंडे, सदा राणे, अनिल गांवकर, पळसंब सरपंच चंद्रकांत गोलतकर, सुनील माळकर, ब्रम्हनाथ टिकम, संतोष सावंत, नारायण सावंत, दिनेश साळकर, राजू पेडणेकर, अनिल बांदेकर, सचिन रेडकर, श्रीकृष्ण वायंगणकर, संजू सावंत, बबन सावंत उपस्थित होते.विरण येथे पोईप सरपंच गिरीजा पालव, शिवराम पालव, संतोष हिवाळेकर, अजिंक्य परब, सोमनाथ माळकर , ज्ञानेश्वर वाडकर, सतीश राठोड, हेमंत पारकर, गिरीष पालव, गोपीनाथ पालव, शुभम भाटकर, नाना तावडे आदी उपस्थित होते.
कोरोना व पाऊस यामुळे अनेक प्रलंबित  कामांना आता गती मिळणार असेही इतर शिवसेना नेत्यांकडून स्पष्ट केले जात आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स