शिरवल गांवचे गांवप्रमुख श्री. दिवाकर सावंत कालवश.
एक सकारात्मक व मार्गदर्शक व्यक्तिमत्त्व हरपल्यामुळे परिसरांवर पसरली शोककळा…!
कणकवली | प्रतिनिधी : कणकवली तालुक्यातील शिरवल गाडेसखलवाडी येथील रहिवासी तथा शिरवल गावचे ग्रामदैवत श्री लिंग रवळनाथ देवालयाचे मानकरी श्री.दिवाकर मारुती सावंत (वय ७२) यांचे बुधवार २४ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वाजता शिरवल येथील निवासस्थानी अल्पशा आजारपणामुळे निधन झाले.गुरुवारी सकाळी शिरवल येथील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.यावेळी गांवातील ग्रामस्थ आणि नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते.मनमिळावू आणि परोपकारी स्वभावामुळे ते सुपरीचीत होते. ते शिरवल गांवचे माजी तंटामुक्त समिती अध्यक्ष होते.त्यांच्या जाण्याने शिरवल गावावर शोककळा पसरली.गांवचे गावप्रमुख म्हणून धार्मिक कार्यक्रमात त्यांचा पुढाकार नेहमीच अग्रभागी होता. गांवातील धार्मिक, सामाजिक कामात त्यांचा पुढाकार आणि मार्गदर्शन मिळत असे.गांवाच्या जडणघडणीत त्यांचे मोठे योगदान होते.त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा,सुन,दोन विवाहित मुली,जावई, नातवंडे असा परिवार आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)