ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
सावंतवाडी नगराध्यक्ष संजू परब यांना 'त्या' म्हणीचे वक्तव्य भोवणार....?
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

सावंतवाडी नगराध्यक्ष संजू परब यांना 'त्या' म्हणीचे वक्तव्य भोवणार....?

प्रकाशन: 25 Nov 2021 02:17 PM
वाचन संख्या 82

सिंधुदुर्ग जिल्हा तेली समाजाच्या वतीने निषेध

सिंधुदुर्ग जिल्हा तेली समाज उन्नती मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची पत्रकार परिषद कणकवलीत

कणकवली | उमेश परब ( सिंधुदुर्ग ब्युरोचीफ ) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी नगराध्यक्ष संजू परब यांनी राजकीय वादातून बोलताना “कहा राजा भोज कहा गंगू तेली… “,असा उल्लेख केला. संजू परब यांनी केलेल्या उल्लेखाने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तेली समाजाच्या भावना दुखावल्या आहेत. संजू परब काम करत असलेल्या पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजन तेली सुद्धा तेली समाजातीलच आहेत. त्यामुळे ही भावना त्यानाही लागू पडते. त्यामुळे समस्त तेली समाजाच्या भावना दुखावल्याबद्दल सिंधुदुर्ग तेली समाजाच्या वतीने नगराध्यक्ष संजू परब यांचा निषेध करत असल्याचे सिंधुदुर्ग जिल्हा तेली समाज उन्नती मंडळाचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मण तेली यांनी केली. जिल्हा सचिव चंद्रकांत तेली यांनी गंगू तेली ही व्यक्ती इतिहासात नव्हती. राजा गांगेय नरेश आणि चालुक्य तैलेय हे दोघे मिळून भोज राजाशी लढले. त्याची तुलना करताना अपभ्रंश झाला. ते गद्दार नव्हते. त्यामुळे राजकीय वक्तव्य करताना जातीचा उल्लेख करून आमच्या भावना दुखावू नयेत. खजिनदार परशुराम झगडे यांनी जर आमच्या समाजाच्या भावना दुखावल्या आहेत, संजू परब यांनी दिलगिरी व्यक्त केली नाही तर त्याचा फटका भाजपाला निवडणुकीत बसेल असा इशारा दिला. शैलेंद्र डिचोलकर यांनीही संजू परब यांच्या वक्तव्याबद्दल तीव्र आक्षेप घेतला. यावेळी आबा तेली, प्रकाश काळसेकर, विशाल नेरकर, दया हिंदळेकर, साई आंबेरकर आदी उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स