ताज्या बातम्या
स्वर्गानंद ट्रॅव्हल्सतर्फे 'दिव्य दत्त परिक्रमा' यात्रेचे आयोजन. महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान. साहित्यिक दीपक पटेकर यांना मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान, मुंबईचा सर्वोत्कृष्ट गद्य स्तंभलेखन पुरस्कार प्रदान.
धनगर समाजबांधवांनी घर बांधणी योजनेचा लाभ घ्यावा : समाज कल्याण सहा.आयुक्त दीपक घाटे.
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

धनगर समाजबांधवांनी घर बांधणी योजनेचा लाभ घ्यावा : समाज कल्याण सहा.आयुक्त दीपक घाटे.

प्रकाशन: 25 Nov 2021 05:42 PM
वाचन संख्या 61

ओरोस | प्रतिनिधी : धनगर समाज बांधवाच्या विकासाठी विशेष कार्यक्रम भटक्या जमाती-क प्रवर्गातील धनगर समाजासाठी घरे बांधण्याची योजना अंमलात आली असून जिल्ह्यातील सर्व धनगर बांधवांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन समाज कल्याण विभागाचे  सहायक आयुक्त श्री.दीपक घाटे यांनी केले आहे.
या योजना यशवंतराव चव्हाण  मुक्त वसाहत धर्तीवर सुरु करण्यात आली आहे. ही योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित सर्व धनगर  बांधवांना सुचित करण्यात येते की सदर योजना वैयक्तिक व सामुहीक स्वरुपाची आहे. या योजनेबाबत अर्ज ग्रामविकास अधिकारी, सरपंच यांचे मार्फत  गट विकास अधिकारी यांच्याकडे सादर करण्यात यावित. या योजनेचा लाभ घेण्यासाठीचे निकष पुढील प्रमाणे आहेत. लाभार्थी धनगर कुटुंबातील भटक्या जमाती -क या मुळ प्रवर्गातील असावा. कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न १ लाख रुपये पेक्षा कमी असावे. कुटुंबाचे  स्वत:चे मालकीचे घर नसावे. कुटुंब हे भूमिहीन असावे.  महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असवा. राज्यात कोठे ही घरकुल योजनेचा लाभ घेतलेला नसावा. सदर योजनेचा लाभ हा कुटुंबातील एकाच व्यक्तीस देण्यात येईल. लाभार्थी वर्षभरात ६ महिने एका ठिकाणी वास्तव्यास असावा.
या योजनेचा लाभ  घेण्यासाठीच्या अटी व शर्ती पुढील प्रमाणे आहेत. या योजनेंतर्गत लाभार्थी कुटुंबाना मिळणारा भुखंड व त्यावरिल घर हे संयुक्तपणे पती व पत्नीच्या नावे केले जाईल मात्र विधवा व परितक्त्या स्त्रियांच्या बाबतीत भूखंड व त्यावरील घर त्यांच्या नावेच केले जातील.  या योजनेंतर्गत मिळालेला भूखंड  व त्यावरील घर लाभार्थी कुटुंबास कोणत्याही कारणास्तव कोणत्याही व्यक्तीला कोणत्याही प्रकारे हस्तांतरित करता येणार नाही, तसेच भूखंड व घर कोणत्याही परिस्थितीत विकता येणार नाही. या योजनेचा लाभ कुटुंबातील एकाच कायदेशीर व्यक्तीस देण्यात येईल. लाभार्थी कुटुंब हे भुमिहीन असावे.  भूखंडावरील जागेचा वापर हा भाडे तत्वावर अन्य व्यक्ती, कुटुंबास देता येणार नाही. तसेच पोट भाडेकरु सुध्दा ठेवता येणार नाही तथा विकता येणार नाही. तसे आढळून आल्यास सदरचा लाभ रद्द करण्यात येईल व मंजुर केलेल्या निधीच वसुली केली जाईल. प्रस्तुत घराचे बांधकाम झाल्यानंतर ग्रामपंचायतीकडून आकारण्यात येणारी वार्षिक घरपट्टी लाभार्थ्यांनी स्वत: भरावयाची आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स