ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
कणकवलीत "किलबिल जल्लोष लहान मुलांसाठी" हा कार्यक्रम होणार ४ डिसेंबरला : बंडू हर्णे.

कणकवलीत "किलबिल जल्लोष लहान मुलांसाठी" हा कार्यक्रम होणार ४ डिसेंबरला : बंडू हर्णे.

प्रकाशन: 22 Nov 2021 04:46 PM
वाचन संख्या 92

समीर नलावडे मित्रमंडळाच्यावतीने होते आहे आयोजन..

कणकवली | उमेश परब : समीर नलावडे मित्रमंडळाच्यावतीने कणकवलीत “किलबिल जल्लोष लहान मुलांसाठी” हा उपक्रम तथा कार्यक्रम ४ डिसेंबरला होणार आहे.नुकतेच नगराध्यक्ष श्री. समीर नलावडे यांच्या आईचे निधन झाल्याने हा कार्यक्रम पुढे घेण्यात आला होता.कणकवली गणपती साना येथे हा कार्यक्रम होईल.या कार्यक्रमाचे उद्घाटन आ.नितेश राणे यांच्या हस्ते सायंकाळी ५ होणार आहे.जादूगार सुचित्रा इंदूलकर(मुबंई -पुणे) यांचे जादूचे प्रयोग असतील,तर ऑर्केस्ट्रामध्ये गायक सौरभ दप्तरदार गायन करणार आहेत.खाऊगल्लीचे खास आकर्षण असणार आहे.
हा कार्यक्रम बाल दिनाचे औचित्य साधून केला जाणार आहे.एक दिवस खाऊ गल्ली असणार आहे.लहान मुले व सर्वांसाठी ऑर्केस्ट्रा असरणार आहे,गायक सौरभ दप्तरदार असेल.लहान मुलांसाठी जादूचा प्रयोग असणार आहेत.खेळणी व ८ कार्टून आहेत,मुलांना चॉकलेट देतील. विविध प्रकारचे स्टाँल लागतील,त्यांना मोफत खुर्च्या,टेबल आम्ही उपलब्ध करुन देणार आहोत.५०० लहान मुलांना आकर्षक भेटवस्तूही देण्यात येणार आहेत.
वेगवेगळ्या प्रकारचे खाद्यपदार्थ आस्वाद घेता येणार आहेत. कार्यक्रम ६ वाजता ते १० वाजता होईल.लहान मुलांना आकर्षक भेट वस्तू देण्यात येणार आहे.दोन सेल्फी पॉईंट ठेवण्यात येणार आहेत.लहान मुलांना मजा मस्ती करता येणार आहे.पालक व विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे,असे आवाहन बंडू हर्णे यांनी केले.
यावेळी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांच्यासह गटनेते संजय कामतेकर, किशोर राणे,अभिजित मुसळे,महेश सावंत,अजय गांगण आदी उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स