ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
कै.सत्यविजय भिसे यांचा १९ वा स्मृतीदिन झाला  साजरा.

कै.सत्यविजय भिसे यांचा १९ वा स्मृतीदिन झाला साजरा.

प्रकाशन: 22 Nov 2021 04:02 PM
वाचन संख्या 149

स्मृतीदिनानिमित्त शिवडाव येथील कै.सत्यविजय भिसे मित्रमंडळामार्फत विविध समाज विधायक उपक्रम

कै.सत्यविजय भिसे यांच्या समाजकार्याच्या स्मृतींना दिला मान्यवरांनी उजाळा..!

कणकवली | उमेश परब (ब्युरोचीफ सिंधुदुर्ग ): कै.सत्यविजय भिसे यांच्या जाण्याने त्यांच्या कुटुंबासोबत सर्वसामान्य जनतेवर दुःखाचा डोंगर कोसळला व नुकसानही झाले आहे. कारण सत्यविजय भिसे हे समाजात प्रामाणिकपणे काम करणारे सच्चे सामाजिक कार्यकर्ते होते. रात्री अपरात्री कधीही कोणावर काही प्रसंग ओढवला की त्या ठिकाणी काळ वेळ याचा विचार न करता सत्यविजय भिसे धावून जात असत सामाजिक कामात अग्रेसर असलेले १९ वर्षांपूर्वीचे सत्यविजय भिसे तरुण पिढीला समजले पाहिजेत. समाजपयोगी कामे करणाऱ्या सत्यविजय भिसे यांनी नेहमीच अन्याया विरोधात लढा दिला होता. समाजाच्या प्रती आस्था ठेवणारे असे अजून सत्यविजय भिसे घडले पाहिजेत. असे प्रतिपादन आमदार वैभव नाईक यांनी केले.
कै. सत्यविजय भिसे मित्रमंडळ शिवडाव यांच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते सत्यविजय भिसे यांचा १९ वा स्मृती दिन साजरा करण्यात आला. त्याप्रसंगी आमदार वैभव नाईक बोलत होते.
यावेळी जिल्हाबँक अध्यक्ष सतीश सावंत, शिवसेना नेते संदेश पारकर, नगरसेवक सुशांत नाईक, संदेश पटेल, सोमा गावकर, बाळा भिसे, कळसुली सरपंच साक्षी परब, शिवडाव सरपंच वनिता जाधव, विलास गावकर, मित्रमंडळाचे अध्यक्ष सत्यविजय जाधव, माजी पंचायत समिती सदस्य अभय गावकर, भास्कर राणे, श्रीकांत तेली, संजय पारकर, बाळू पारकर, अरविंद दळवी, रविकांत सावंत, दादा भोगले, लवू पवार, चंदू परब, सुशांत दळवी, नितीन गावकर, नंदू परब, आणा नानचे, राजू पाताडे, लवू परब, जय शेट्ये, अमित सावंत, रोहित राणे, नितीन हरमलकर, सुनील हरमलकर, नितीश भिसे, महेश शिरसाठ, प्रशांत कुडतरकर, आणा सदडेकर, संजय सावंत, दाजी कोरगावकर, दीपक कोरगावकर, सुनील राऊत, गणेश शिवडावकर, संतोष दळवी, उत्तम राणे, जयसिंग राणे, दर्शना शिरसाट, आदींसह सत्यविजय भिसे प्रेमी उपस्थित होते. या स्मृतीदिनाचे औचित्य साधून सलग १९ व्या वर्षी रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते यावेळी सुमारे ५२ दात्यांनी रक्तदान करत भिसे यांना श्रद्धांजली वाहिली.
यावेळी बोलताना जिल्हाबँक अध्यक्ष सतीश सावंत यांनी भिसे व सावंत कुटुंबियांच्या कौटुंबिक नात्यातील आठवणींना उजाळा दिला. ते म्हणाले २००२ मध्ये ही घटना घडली त्यावेळी आम्ही वेगळ्या प्रवाहात होतो. तेव्हाच्या वाईट प्रवृत्तीला आमचा विरोध होता मात्र दहशतीचे वातावरण असल्याने ती दहशत मोडून काढण्याची ताकत आमच्यात नव्हती त्यासाठी आपण भिसे कुटुंबीय व त्यांच्या प्रेमींची मनापासून माफी मागतो. एवढा प्रसंग ओढवून देखील भिसे कुटुंबियानीं आमच्या सोबत ऋणानुबंध कायम ठेवले होते व आजही आहेत. आजच्या तरुण पिढीने कै.सत्यविजय भिसे यांचा आदर्श घ्यावा. कारण त्याकाळी अरे ला कारे म्हणण्याची धमक भिसे यांनी ठेवली होती. व ते कोणत्याही धमकीला भिऊन माघारी फिरले न होते. आपल्याला काय मिळेल याचा विचार न करता प्रामाणिक पणे सत्यविजय भिसे यांनी काम केले. म्हणून आज १९ वर्षे त्यांच्या स्मृती जिवंत आहेत.
यावेळी बोलताना शिवसेना नेते संदेश पारकर यांनी सत्यविजय भिसे यांच्या आठवणींना उजाळा दिला ते म्हणाले. अनेकांची घरे उभी करणारी व्यक्ती भविष्यात आपल्याला डोईजड होणार या भीती पोटी काही अपप्रवृत्तीच्या लोकांनी त्यांची निर्घृण हत्या करून क्रूर कृत्य घडविले. त्या अपप्रवृत्तीच्या विरोधात लोकशाहीच्या कोर्टात न्याय मिळाला नसला तरी परमेश्वराच्या कोर्टात न्याय मिळाला आहे. ज्यांनी भिसे यांची हत्या केली त्यांची अवस्था काय झाली याबाबत सर्वांना कल्पना आहे. तर ज्यांनी राजकीय हेतूने हत्या घडवून आणली त्यांचा राजकीय प्रवास अधोगतीकडे चालला आहे. अशा अपप्रवृत्तीना गाडून टाकणे गरजेचे आहे. सत्यविजय भिसे यांनी विकासाची गंगा आपल्या भागात प्रयत्न केला. त्यांचे बलिदान विसरण्याजोगे आहे. सत्यविजय भिसे मित्रमंडळाच्या वतीने सत्यविजय भिसे यांचे कार्य कायम तेवत ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
यावेळी सत्यविजय भिसे मित्रमंडळाच्या वतीने वारकरी सांप्रदायाच्या हरी भक्तांचा शाल श्रीफळ व पुष्प देऊन सन्मान करण्यात आला. तर उपस्थित पंचक्रोशीतील महिलांना साडी वाटप करण्यात आले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स