ओंबळ प्रशालेचे उपक्रमशील शिक्षक गोविंदराव जाधव राज्यस्तरीय आदर्श पुरस्काराने सन्मानित..!
शिरगांव / संतोष साळसकर : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील ओंबळ गावांतील प्रशालेचे उपक्रमशील व आदर्श शिक्षक गोविंदराव जाधव यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याची दखल घेवून मानव विकास बहुउद्देशीय सेवाभावी संस्था लातूर, यांच्याकडून राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार पद्मश्री पोपटराव पवार व पद्मश्री डाॅ.तात्याराव लहाने यांच्या शुभहस्ते दयानंद सभागृह लातूर येथे देण्यात आला.व्यासपीठावर पद्यमश्री डाॅ .तात्याराव लहाने प्रसिद्ध नेत्ररोगतज्ञ पद्मश्री मामु शब्बीर सय्यद , पद्मश्री पोपटराव पवार (आदर्शग्राम हिवरेबाजार, जि . अहमदनगर) डाॅ. विठ्ठल लहाने प्रसिद्ध प्लास्टिक सर्जन,पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री नाम.संजयजी बनसोडे,शिक्षक आमदार मा.विक्रमजी काळे ,साहित्यिक तथा कवी इंद्रजीत भालेराव,मानव विकास संस्थेचे संस्थापक मा.वसंत घोगरे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला .या पुरस्कारामुळे श्री जाधव यांची सर्व स्तरांतून प्रशंसा होत आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)