ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
'तिमिरातुनी तेजाकडे' उपक्रम झाला अर्धशतकापार..!

'तिमिरातुनी तेजाकडे' उपक्रम झाला अर्धशतकापार..!

प्रकाशन: 21 Nov 2021 07:52 PM
वाचन संख्या 71

संपूर्ण निःशुल्क उपक्रम…

मसुरे | प्राजक्ता पेडणेकर : तिमिरातुनी तेजाकडे” या संस्थेच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यासह, अहमदनगर, नाशिक, पालघर येथे एकूण ५२ निःशुल्क व्याख्याने पूर्ण झाली आहेत.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकूण ४५ निःशुल्क शासकीय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व्याख्याने घेऊन मुंबई सीमाशुल्क, भारत सरकार या विभागात कनिष्ठ अऩुवाद अधिकारी या पदावर कार्यरत असणारे श्री. सत्यवान यशवंत रेडकर यांनी ऐतिहासिक नोंद केली आहे. “तिमिरातुनी तेजाकडे” या संस्थेच्या माध्यमातून “न भूतो न भविष्यती” एकल स्वरूपात सिंधुदुर्ग जिल्ह्यासह, अहमदनगर, नाशिक, पालघर येथे एकूण ५२ निःशुल्क शासकीय स्पर्धा परीक्षा व्याख्याने घेऊन नुकतेच अर्धशतक पूर्ण केले आहे. शासकीय कर्मचा-यांचे गाव ही स्वप्नातली संकल्पना सत्यात उतरविण्यासाठी श्री. सत्यवान रेडकर शैक्षणिक चळवळ राबवित आहेत. सात शैक्षणिक अर्हता धारणे केलेले रेडकर हे व्याख्यानासाठी कोणतेही मानधन किंवा प्रवास खर्च न घेता स्वतःची वैयक्तिक सुट्टी खर्च करून गावागावातून शासकीय अधिकारी/कर्मचारी घड़विण्यासाठी प्रयत्नशील आहेत. तिमिरातुनी तेजाकडे संस्थेच्या विविध व्हाटसएप, टेलिग्राम समूहांतून विद्यार्थ्यांना निःशुल्क जाहिराती, सामान्य ज्ञान, ज्ञानवर्धक माहिती, विविध अपडेटस तसेच अध्ययन साहित्याचे वेळोवेळी प्रसारण सुद्धा केले जाते. जास्तीत जास्त कोकणातील तसेच महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनी संपर्कात राहून स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून आपले उज्ज्वल भवितव्य घडविण्यासाठी आवाहन या संस्थेचे अध्यक्ष श्री. सचिन यशवंत रेडकर (मोबा.९९६९६५७८२०/ ९७६८७३८५५४) यांनी केले आहे. दिनांक १८ ते २४ डिसेंबर २०२१ च्या दरम्यान रत्नागिरी शहर, राजापुर, देवगड, कणकवली (सावडाव), आंबोली, असनिये, सातार्डा, बांदा या ठिकाणी सुद्धा निःशुल्क शासकीय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व्याख्याने होणार असल्याची माहिती सत्यवान रेडकर यांनी दिली आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स