शिवशाहीर कै.बाबासाहेब पुरंदरे यांना कणकवलीतील शोकसभेत आदरपूर्वक श्रद्धांजली..!
कणकवली | प्रतिनिधी : कणकवली शहरामध्ये कै. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी रविवारी २१ नोव्हेंबरला सकाळी शोकसभा आयोजीत झाली. या सभेत विविध पक्षांचे लोकप्रतिनिधी, विविध कलावंत आणि कै.बाबासाहेब पुरंदरे प्रेमी उपस्थित होते.
शोकसभेस मातोश्री शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष माजी आमदार परशुराम उपरकर ,आम. वैभव नाईक, माजी आम. राजन तेली, जिल्हाधिकारी मा. के. मंजुलक्ष्मी, जिल्हा पोलिस अधिक्षक श्री. राजेंद्र दाभाडे,कणकवलीचे उपनगराध्यक्ष श्री.बंडू हर्णे,जि. प.अध्यक्षा सौ. संजना सावंत, जिल्हा बँक अध्यक्ष श्री. सतीश सावंत,कणकवलीचे माजी नगराध्यक्ष श्री. संदेश पारकर, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष श्री.काका कुडाळकर विशेष उपस्थित होते.
कणकवली तहसीलदार सौ. प्रिया परब,पोलिस निरीक्षक श्री. हुंदळेकर आणि डॉ. विद्याधर तायशेट्ये, श्री. हरिभाऊ भिसेसर, मोहन सावंत सर,डॉ. गाड, अभिनेत्री व सामाजिक कार्यकर्त्या सौ. अक्षता कांबळी, श्री. नितीन तळेकर,चंद्रशेखर उपरकर, शाम सावंत,संतोष सावंत,अशोक करंबेळकर, अनिल हळदिवे,अनिल कुलकर्णी, रविंद्र ताँबोलकर, मनसे उपजिल्हाध्यक्ष श्री. दया मेस्त्री, ऍड. विलास परब ,श्री. अमोल खानोलकर हे मान्यवरदेखिल शोकसभेला उपस्थित होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)