ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
कळसुली प्राथमिक आरोग्य केंद्रात डाॅक्टरांच्या हलगर्जीपणामुळेच महिलेचा मृत्यू...?

कळसुली प्राथमिक आरोग्य केंद्रात डाॅक्टरांच्या हलगर्जीपणामुळेच महिलेचा मृत्यू...?

प्रकाशन: 20 Nov 2021 12:55 PM
वाचन संख्या 107

ग्रामस्थांनी आरोप लावत तालुका आरोग्य अधिकारी डाॅक्टर पोळ यांना घेराव घालून विचारला जाब….!

कणकवली / उमेश परब : कळसुली प्राथमिक आरोग्या केंद्रात डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळेच आज पहाटे सहाच्या सुमारास कळसुली परबवाडी येथील महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. कळसुली गावातील ही तिसरी घटना आहे. कळसुली प्रा. आरोग्य केंद्रात रात्री डॉ.गणेश आयणार यांनी आपली ड्युटी संपवायच्या आधीच घरी परतले गेले असल्यामुळे परब यांचा दुर्दैवाने मृत्यू झाला आहे असल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे. सर्वसामान्य नागरिकांना जीव गमवावा लागत असल्याने कळसुली गावातील ग्रामस्थांनी कणकवली तालुका अधिकारी डॉ.पोळ यांना घेराव घातला आहे. कळसुली ग्रामपंचायत सरपंच साक्षी परब, तंटामुक्ती अध्यक्ष चंदू परब, रुपेश आंडोस्कर,सुशांत दळवी, मधुकर चव्हाण, रुजाय फर्नांडिस, मोहन दळवी,विजय परब, नंदू परब, गुणाजी परब, सत्यवान परब, नंदकिशोर सुद्रीक,कळसुली गांवातील नागरिक मोठया संख्येने उपस्थित झाले आहेत.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स