ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
डोंबिवलीतील रक्तदान शिबिरात केले ४० दात्यांनी रक्तदान !

डोंबिवलीतील रक्तदान शिबिरात केले ४० दात्यांनी रक्तदान !

प्रकाशन: 16 Nov 2021 03:26 PM
वाचन संख्या 72

मसुरे | प्राजक्ता पेडणेकर : ग्लोबल रक्तदाते कोकण महाराष्ट्र आणि ग्लोबल मालवणी यांच्या संयुक्त विध्यमाने शास्त्रीनगर हॉस्पिटल चिदानंद रक्तपेढी डोंबिवली येथे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. यात ४० रक्तदात्यांनी रक्तदान करून योगदान दिले. रक्तदान शिबिराचे उदघाटन शास्त्री हॉस्पिटल डोंबिवलीच्या आरोग्य अधिकारी डॉ.सौ.सुहासिनी बडेकर याच्या हस्ते करण्यात आले.
ह्या वेळी ग्लोबल रक्तदाते परिवारातील गेली चार वर्षे नियमित निगेटिव्ह ब्लडग्रुप रक्तदाते ,दर तीन महिन्यांनी रक्तदान करणारे निस्वार्थ रक्तदात्यांचा आदर्श ग्लोबल रक्तदाता पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
नियमित रक्तदान करणारे विनोद गवंडी,किशोर गवंडी,ललित गवंडी(भांडुप) कुटुंबाला आदर्श ग्लोबल रक्तदाता कुटूंब पुरस्कार देण्यात आला.तर ग्लोबल मालवणी अध्यक्ष श्री. सचिन आचरेकर व सौ डॉ.गौरी आचरेकर यांना ग्लोबल रक्तदाते आदर्श जोडपे पुरस्कार दिला गेला.सर्व रक्तदात्याना मेडल,व रक्तपेढी मार्फत प्रमाणपत्र देण्यात आले. रक्तदान क्षेत्रातील आदर्श गुरुवर्य श्री. जयराम नाईक यांनी केलेले वैयक्तिक ७८ वे रक्तदान सर्वांचे आकर्षण ठरले.
रक्तदान करून दुसऱ्याच्या आयुष्यात सोनेरी क्षण देणाऱ्या सर्व रक्तदात्यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले.
ह्या शिबिर दरम्यान चिदानंद ब्लडबँक तसेच शास्त्रीनगर हॉस्पिटल यांचे सहकार्य लाभले.
ह्या शिबीर मध्ये जास्तीत जास्त नवीन रक्तदात्यांनी रक्तदान केले.
शिबिर यशस्वीपणे आयोजन करिता ग्लोबल रक्तदाते समिती सदस्य श्री. किरण पुजारी,श्री.सागर चव्हाण सदानंद चव्हाण, महेश पाटकर, सौ वंदना जाधव,निनाद ठकरूल,तेजस पांचाळ,योगेश वालावलकर,
विनायक पावसकर, सिद्धेश मांडवकर,हेमंत मांडवकर ,
ग्लोबल मालवणी परिवार श्री. सचिन आचरेकर,गौरी आचरेकर, गुरुनाथ तिरपनकर,संजय चव्हाण,प्रफुल्ल मोरे,अभिषेक मुणगेकर,सिंधुदुर्ग रेड बटालियन संघ यांचे विशेष सहकार्य लाभले. रक्तदान शिबिरासाठी मदत करणाऱ्या सर्वांचे ग्लोबल रक्तदाते आणि ग्लोबल मालवणी परिवारातर्फे आभार मानण्यात आले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स