ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
तुलसी विवाहावर पावसाच्या अक्षता...! ( विशेष वृत्त)

तुलसी विवाहावर पावसाच्या अक्षता...! ( विशेष वृत्त)

प्रकाशन: 16 Nov 2021 09:23 PM
वाचन संख्या 228

कणकवली | उमेश परब | ( ब्युरो चीफ सिंधुदुर्ग ): दिवाळीनंतर सर्वत्र आनंदात साजरा होणारा सण म्हणजे तुलसी विवाह..! कार्तिक शुद्ध द्वादशी दिवशी तुलसी वृंदावनाची सजावट करून पारंपरिक पद्धतीने अगदी भक्ती भावाने पूजन करून विवाह सोहळा पार पडला जातो गेली दोन वर्षे कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे अगदी घरगुती पद्धतीत तुलसी विवाह सोहळा पार पडला होता. या वर्षी कोरोनाचे नियम काही प्रमाणात शिथिल झाल्यानंतर तुलसी विवाह आनंदात साजरा करण्याच्या तयारीत असलेल्या जिल्हावासीयांच्या आनंदावर पावसाने पाणी फेरले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात दोन दिवस अगोदर तुलसी विवाहाची तयारी केली जाते. यात अंगणाचे सारवण, तुलसी रुंदावन धुवून स्वच्छ करून त्यावर रंगरंगोटी केली जाते. तुलसी विवाहाच्या दिवशी रांगोळी काढून अगदी जय्यद तयारी केली जाते. या वर्षी ही अगदी उत्साहात हा विवाह सोहळा पार पाडण्यासाठी जिल्हावासीय सज्ज असतानाच पावसाने आपल्या अक्षता तुलसी रुंदावनावर टाकून सर्व प्रयत्नांवर पाणी फेरले आहे. तब्बल दोन वर्षानंतर तुलसी विवाह सोहळा आनंदात साजरा करण्याचा जिल्हावासीयांचा मनसुबा पाण्यात वाहून गेला आहे. यंदा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सणवार,शेती आणि सांस्कृतिक परंपरा यावर नैसर्गिक अनिश्चिततेचे सावट राहीले आहे. तुलसी विवाहाचे पारंपारिक व सांस्कृतिक समाधान मिळण्यापासून वंचित राहिल्याने सामान्य जिल्हावासियांची नक्कीच हिरमुसलेपणाची भावना व्यक्त होत आहे. तुलसी विवाहावर आजच्या पावसाच्या अक्षता हुरहूर लावून गेल्यात असाही बहुतांश जणांचा सूर आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स