'परी' ऊर्फ मायरा वायकुळ हिला बाल कलाकार पुरस्कार प्रदान...!
#सिनेपट
मसुरे | प्राजक्ता पेडणेकर : झी मराठी वाहिनीवरील ‘माझी तुझी रेशीम गाठ’,या मालिकेतील परीची भूमिका साकारणाऱ्या कुमारी मायरा वायकुळ हिला कै.सुधाताई करमरकर यांच्या स्मरणार्थ बाल कलाकाराने सन्मानीत करण्यात आले आहे. मायराला हा पुरस्कार नाट्य व्यवस्थापक व आंगणेवाडीचे सुपुत्र नरेंद्र आंगणे यांच्या हस्ते मुंबई येथे प्रदान करण्यात आला.
मराठी रंगभूमीवरील जेष्ठ अभिनेत्री व बाल रंगभूमीवरील लिटिल थिएटरच्या संचालिका कै.सुधाताई करमरकर यांच्या स्मरणार्थ बाल कलाकारांना सन्मानित करण्यासाठी सदर पुरस्काराची घोषणा त्यांचे सचिव व नाट्य व्यवस्थापक नरेंद्र आंगणे यांनी केली होती.पुरस्काराच्या रूपाने जेष्ठ कलाकार सुधाताई करमरकर यांच्या स्मृती सर्वांच्या हृदयात राहतील असे यावेळी श्री आंगणे म्हणाले. सदर पुरस्काराचे वितरण बालदिनी करण्यात आले. यावेळी मायरा वायकुळच्या पालकांसह चित्रपट सुस्ष्टीतील विविध मान्यवर उपस्थित होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)