विश्व वारकरी संघाच्या कार्याध्यक्षपदी मंगेश बोरकर यांची निवड
मसुरे | सौ. प्राजक्ता पेडणेकर : मुणगे गावचे सुपूत्र व श्री देवी भगवती छाया प्रतिष्ठानचे सदस्य ह. भ. प. मंगेश (राजू) महाराज बोरकर यांची विश्व वारकरी संघाच्या देवगड तालुका कार्याध्यक्ष पदी नियुक्ती झाली आहे. कोकण विभाग उपाध्यक्ष ह. भ. प. नंदादीप महाराज वांजरे यांच्या शिफारशीने सदर नेमणूक करण्यात आली आहे. भजन कीर्तन, वादनाची आवड, निर्व्यसनी व सर्व सामन्यात समावणारे असे व्यक्तीमत्व मंगेश बोरकर यांच्या रूपाने कार्याध्यक्ष म्हणून तालुक्यास लाभल्याची भावना व्यक्त होत आहे. सदर निवडी बद्दल बोरकर यांचे अभिनंदन होत आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)