कलमठ येथील रामचंद्र नरे यांंचे निधन.
कणकवली | प्रतिनिधी : कलमठ गावडेवाडी येथील रामचंद्र सदाशिव नरे (वय ७३) यांचे ह्रदयविकाराने दि.१२ रोजी सायंकाळी कोल्हापूर येथील रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले.
त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, सून, मुलगी, भाऊ,भावजय,जावई नातवंडे असा परिवार आहे.राणे समर्थक भाजप कार्यकर्ते व ट्रॅव्हल्स व्यावसायिक श्री कमलेश नरे यांचे ते वडील होत. श्री.नरे यांच्या निधनाने परिसरात शोक व्यक्त होत आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)