ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
ओरोस येथे सिंधुदुर्ग जिल्हा वारकरी संप्रदाय सिंधुदुर्गचा मेळावा २६ डिसेंबरला…

ओरोस येथे सिंधुदुर्ग जिल्हा वारकरी संप्रदाय सिंधुदुर्गचा मेळावा २६ डिसेंबरला…

प्रकाशन: 13 Nov 2021 05:32 PM
वाचन संख्या 29

ब्युरो न्यूज | उमेश परब: सिंधुदुर्ग जिल्हा वारकरी संप्रदाय, सिंधुदुर्ग चा अकरावा जिल्हा मेळावा सिंधुदुर्ग नगरी(ओरोस) येथे रविवार दिनांक २६ डिसेंबर २०२१ रोजी होणार आहे आज जिल्हा वारकरी संप्रदायाची सभा जिल्हा अध्यक्ष ह.भ.प.विश्वनाथ गवंडळकर महाराज यांच्या अध्यक्षतेखाली व कार्याध्यक्ष ह.भ.प.रामचंद्र कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली. यावेळी उपाध्यक्ष हरीचंद्र परधीये,जिल्हा सचिव श्री.राजू राणे, खजिनदार मधुकर प्रभुगावकर, श्री.प्रभाकर सावंत, ह.भ.प.विजय सुतार,चंद्रकांत परब,विजय राणे, ह.भ.प. प्रकाश सावंत उपस्थित होते. प्रतीवर्षी प्रमाणे ६५ वर्षांवरील वारकरी संप्रदायातील कीर्तनकार, मृदंगमणी, प्रवचनकार यांना देण्यात येणारा मानाचा संतसेवा पुरस्कार यावर्षी ही देण्यात येणार असून सिंधुदुर्ग जिल्हा वारकरी संप्रदायातील संबंधित वारकऱ्यांनी आपल्या संपूर्ण माहिती व फोटो सह दिनांक २० डिसेंबर २०२१ पर्यंत पोहचतील असे अर्ज ,’अध्यक्ष/सचिव सिंधुदुर्ग जिल्हा वारकरी संप्रदाय, सिंधुदुर्ग मुख्यकार्यालाय- हळवल ता. कणकवली, जिल्हा-सिंधुदुर्ग ‘,या पत्त्यावर पाठवावेत असे आवाहन जिल्हा अध्यक्ष ह.भ.प.विश्वनाथ गवंडळकर महाराज, व सचिव श्री.राजू राणे यांनी केले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स