ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
ब्लॅक पँथरच्या सुटकेचा थरार....!

ब्लॅक पँथरच्या सुटकेचा थरार....!

प्रकाशन: 11 Nov 2021 07:41 PM
वाचन संख्या 115

मसुरे | प्राजक्ता पेडणेकर : सिंधुदुर्ग जिल्ह्यात ब्लॅक पँथरचे पहिलेच रेस्क्यू ऑपरेशन गुरुवारी वनविभागाकडून करण्यात आल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी अमृत शिंदे यानी दिली.गुरुवारी सकाळी ११ च्या सुमारास  कुडाळ तालुक्यातील गोवेरी  येथील श्री. तुकाराम राऊळ यांच्या आंबा-काजू बागेच्या सिंचनासाठी बांधलेल्या ८ फूट खोल पाण्याच्या टाकीमध्ये काळा बिबट (ब्लॅक पँथर) पडल्याची माहिती  वनविभागास मिळाल्या नंतर वनविभागाचे बचाव पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.  त्यानंतर बचाव पथकाने ८ फूट खोल टाकीमध्ये पिंजरा सोडत ग्रामस्थांच्या मदतीने त्याला पिंजऱ्यात घेत सुखरुप बाहेर काढण्यात आले. भक्ष्याच्या मागे धावत असताना तो विहिरीत पडला असावा  असे वनविभागाच्या वतीने सांगण्यात आले.
सदर बिबट हा नर जातीचा असून अंदाजे दोन वर्षे वयाचा आहे. पशु वैद्यकीय अधिकारी यांचेकडून त्याची वैद्यकीय तपासणी करून त्यास नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात आले.
यावेळी वनपरिक्षेत्र अधिकारी श्री.अमृत शिंदे म्हणाले,
काळा बिबट अत्यंत दुर्मिळ बिबट प्रजात असून जनुकीय बदलांमुळे त्याचा रंग काळा होत असतो. जिल्ह्यात ब्लॅक पँथर चा पहिलाच रेस्क्यू आहे. बिबट हा निशाचर असून बहुतांशी भक्ष्याच्या शोधात तो रात्री बाहेर पडतो. बिबट्याच्या नैसर्गिक अधिवासामध्ये आढळनारे प्राणी जसे बेडूक, उंदीर, घुशी, ससे, साळींदर, घोरपड, पक्षी, माकडे यांपासून ते लहान आकाराची हरणे यांवरती ते उपजीविका करतात. बिबट हा अन्नसाखळीच्या सर्वोच्च स्थानी असून परिसंस्थेचा समतोल राखण्यासाठी महत्वाचा घटक आहे. काळा बिबट हा अत्यंत दुर्मिळ बिबट असून त्याचे निसर्गातील वास्तव्य हे जिल्ह्यातील जंगलाचे परिपूर्णतेचे सकारात्मक प्रतिक आहे.
कोणताही वन्यप्राणी जखमी अथवा अडकलेल्या स्थितीत आढळून आल्यास तात्काळ वनविभागास माहिती द्यावी अस आवाहनही करणेत आले.
सदर बचावकार्य उपवनसंरक्षक (प्रा.) सावंतवाडी श्री. शहाजी नारनवर व सहाय्यक वनसंरक्षक (खाकुतो व वन्यजीव) सावंतवाडी श्री. आय. डी. जालगावकर यांचे मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी, कुडाळ श्री. अमृत शिंदे, वनपाल नेरूर त हवेली धुळु कोळेकर, वनपाल मठ अ. स. चव्हाण,वनपाल मालवण श्रीकृष्ण परीट वनरक्षक नेरूर त हवेली सावळा कांबळे, वनरक्षक मठ सुर्यकांत सावंत, वाहनचालक राहुल मयेकर यांनी स्थानिक ग्रामस्थ  दत्ताराम गावडे, सुशांत गावडे, बाळू खानोलकर, विश्वजित खानोलकर, अनंत राऊळ, ओंकार जाधव, सतीश गावडे यांच्या मदतीने यशस्वी केले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स