पोईप येथे उद्या तिरंगी भजनाचा सामन्याचे आयोजन..!
पोईप | ओंकार चव्हाण : समस्त पोईप ग्रामस्थ व भजन रसिक यांच्यावतीने भाऊबीज सणानिमित्त शुक्रवार दि 12नोव्हेंबर http://localhost/news/public/uploads/2021 रोजी, रात्री ठिक 8 वाजता, पोईप श्री देव वेताळ मंदिर येथे आमने सामने तिरंगी डबलबारी भजनाचा जंगी सामन्याचे आयोजन करण्यात आले आहे.
याआमने सामने डबलबारीसाठी महादेश्वर प्रासादिक भजन मंडळ नाडण देवगड ,बुवा श्री.संदिप पुजारे यांना पख़वाज मंजिल काळसेकर व तबलासाथ विनायक मेस्त्री आणि डुंगो कमला प्रासादिक भजन मंडळ शेळपी, वेंगुर्ला बुवा श्री दिनेश वागदेकर यांना पख़वाज सचिन राणे व तबलासाथ राजाराम परुळेकर तर वरची देवी प्रासादिक भजन मंडळ लिंगडाळतिठा देवगड बुवा श्री संदिप लोके यांना पख़वाज योगेश सामंत व तबला साथ संदेश सुतार या तिन्ही बुवांचा भजन डबलबारी सामना होणार आहे.
तरी भजन रसिकांनी यांचा लाभ घ्यावा असे आवाहन समस्त पोईप ग्रामस्थांकडून केले गेले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)