ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
जिल्हा बँकेच्या निवडणुका दरवर्षी होत असतील तरच शेतकऱ्यांना न्याय मिळेल ; परशुराम उपरकर.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

जिल्हा बँकेच्या निवडणुका दरवर्षी होत असतील तरच शेतकऱ्यांना न्याय मिळेल ; परशुराम उपरकर.

प्रकाशन: 11 Nov 2021 02:24 PM
वाचन संख्या 56

निवडणुका जवळ येताच कसा आला जिल्हा बँकेला आणि दूध संघाला आला शेतकऱ्यांचा कळवळा असा उपरकर यांचा सवाल..!

कणकवली | उमेश परब : सिंधुदुर्ग जिल्हा बॅकेच्या निवडणुका जवळ येऊ लागताच बँकेच्या संचालक मंडळाला दूध संघाची आणि शेतकऱ्यांची आठवण येते. जिल्हा बँकेचे अध्यक्ष आणि दूध संघाचे जिल्हाध्यक्ष दूध संस्थांना एकत्र करण्याचा प्रयत्न करत आहेत. चार वर्षांत असा प्रयत्न कधी केला नाही. दुग्ध विकासावर मार्गदर्शन करण्यासाठी बंटी पाटील यांचा गोकुळ दूध संघ येणार आहे. या गोकुळ दूध संघाला सिंधुदुर्ग जिल्हा बँकेने कर्ज केले आहे. ज्यावेळी शासकीय डेअरी बंद पाडून गोकुळ दूध संघामार्फत दूध संकलन करणे सुरू झालं, त्यावेळेस साठ प्रकारच्या योजना राबविण्याचे आश्वासन गोकुळ दूध संघामार्फत देण्यात आले होते. मात्र त्या योजना लागू करण्यात आल्या का? त्यानंतर नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त सतीश सावंत, राजन तेली यांनी प्रतिभा डेयरी आणली. या डेयरी मार्फत दूध संकलन केलं जाऊ लागलं. मात्र या प्रतिभा डेअरी मध्ये शेतकऱ्यांचे २ कोटी ६५ लाख रुपये गेली ३ वर्ष थकीत आहेत. भाजपचे आमदार नितेश राणे यांनी निवडणुकीपूर्वी मार्च पर्यंत तुमचे पैसे मी मिळवून देतो, असे शेतकऱ्यांना आश्वासन दिले होते. परंतु त्यांनीही आपला शब्द पाळला नाही. त्यामुळे आता या दूध संघाच्या चेअरमन ला शेतकऱ्यांनी जाब विचारला पाहिजे, असे कणकवली येथील मनसे कार्यालयात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी म्हटले आहे. यावेळी वैभववाडी तालुकाध्यक्ष सचिन तावडे, मनविसेचे अमित इब्रामपूरकर, अनिल राणे उपस्थित होते. निवडणूक जवळ आल्यावर जिल्हा बँक जागी झाली. दूध संघाच्या माध्यमातून आपला उमेदवार उभा करावा, यासाठी यांचे प्रयत्न चालले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी जागृत राहिले पाहिजे. दूध संघाचा सभासद करून घेण्यासाठी आणि योजना लिखित स्वरूपात देण्यासाठी पाठपुरावा केला पाहिजे. तसेच जिल्हा बँकेला, दूध संघाला प्रतिभा डेयरीत आपले थकीत असणारे २ कोटी ६५ लाख रुपये कधी मिळणार आणि त्यांच्यावर गुन्हा कधी दाखल होणार, याविषयी जाब विचारला पाहिजे. गोकुळ दूध संघाने त्याठिकाणी असलेल्या संस्थांना वाहतुकीसाठी लिटरमागे एक रुपया द्या किंवा शंभर मिली कमी करा, असे काम सुरू केले आहे. त्यामुळे हा भुर्दंड शेतकऱ्यांना पडत आहे. त्यामुळे जिल्हा बँकेने आणि दूध संघाने शेतकऱ्यांचे पैसे आधी मिळवून द्यावेत. एखादा दूध संघ एका जिह्यात कार्यरत असताना दुसऱ्या जिल्ह्यात जाण्यासाठी त्यांना परवानगी घ्यावी लागते. परंतु गोकुळ दूध संघ नियमबाह्य आलेला आहे. यावरही शेतकऱ्यांनी विचार करायला हवा. जिल्हा बँकेच्या निवडणूका जर दरवर्षी होत असतील तरच जिल्हा बँकेची कार्यकारीणी सक्रिय होईल. जिल्हा बँक अनेक बिल्डर्स ना कर्ज देतेय. हे २०१७-१८ च्या ऑडिट रिपोर्ट मध्ये नोंद केलं आहे. त्यामुळे बँक अन्य करणासाठीच कर्ज वाटप करत आहे. हे लवकरच आम्ही जनतेसमोर आणू, असा इशाराही परशुराम उपरकर यांनी दिला आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स