सौ.विद्या दुखंडे कालवश.
मसुरे | प्रतिनिधी : मसुरे गडघेरावाडी येथील सौ विद्या विलास दुखंडे (७५ वर्ष) यांचे मुंबई- अंधेरी येथे निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, तीन मुली, जावई, दिर, भावजयी, पुतणे, पुतण्या, नातवंडे असा परिवार आहे. मुंबई येथील सामाजिक कार्यकर्त्या वर्षा दुखंडे यांच्या आई, विलास दुखंडे यांच्या पत्नी तर मसुरे येथील रिक्षा व्यावसाईक अनिल व सुनील दुखंडे यांच्या काकी होत. सौ.विद्या दुखंडे यांच्या निधनाने मसुरे व परिसरांत शोक व्यक्त होत आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)