कणवलीतील 'जाधव फूटवेअर' मध्ये शालेय बूट तथा स्कूल शूजवर मिळतेय पंधरा टक्क्यांची घसघशीत सूट...!
कोरोनाकाळानंतर सामान्य पालकांच्या डगमगलेल्या घरगुती अंदाजपत्रकाला दिलासा द्यायचा एक प्रयत्न…!
कणकवली | उमेश परब : कोरोना काळानंतर आता जनजीवन पूर्वपदावर येत आहे. सणवार व इतर वार्षिक घटकांसोबतच शाळांचीही घडी आता पूर्ववत होत आहे.
शाळा पुन्हा सुरु होणार म्हणले की मुलांच्या शालेय गरजा हाही एक महत्वाचा आर्थिक मुद्दा सामान्य पालकांच्या घरगुती अंदाजपत्रकात येतो. पालक हरप्रकारे त्या गरजा पूर्ण करतातच परंतु त्यात त्यांना थोडी आर्थिक रस्सीखेच होत असते.
ह्या आर्थिक रस्सीखेचीचा विचार करुन कणकवली येथील ‘जाधव फूटवेअर’ या सुप्रसिद्ध पादत्राणांच्या दुकानाद्वारा पालकांना एक दिलासा द्यायचा प्रयत्न केलेला आहे.
जाधव फूटवेअर, कणकवली या दुकानातील शालेय बूट तथा स्कूल शूजवर दुकानधारक सौ.अपूर्वा सुजित जाधव यांनी घसघशीत अशी पंधरा टक्क्यांची सूट देत पालकांच्या आर्थिक ताणाताणीला थोडा आधार दिला आहे .
कोरोना पश्चात उद्योजक व व्यापारीही सामान्य माणसांच्या आर्थिक ओढाताणीला अतिशय संवेदनशीलपणे जाणू लागल्याचेच हे उदाहरण आहे असे सामान्य शालेय पालक व इतर जनतेकडून बोलले जात आहे.
कणकवलीतील जाधव फूटवेअरमध्ये जास्तीतजास्त शालेय पालकांनी स्कूलशूज खरेदी करत त्यांच्या खरेदीवर पंधरा टक्के सूट मिळवावी असेही दुकान व्यवस्थापनाकडून विनम्र आवाहन करण्यात आले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)