किल्ले प्रतिकृती स्पर्धेत बांदा-निमजगा येथील किल्ले प्रतापगडची प्रतिकृती प्रथम...!
येथील शिवतेज सेवा संस्थेच्या वतीने करण्यात आले आयोजन
बांदा | राकेश परब : बांदा येथील शिवतेज सेवा संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या किल्ले स्पर्धेला उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. या स्पर्धेत एकूण १८ किल्ल्यांच्या प्रतिकृती सहभागी झाल्या होत्या. बांदा-निमजगा येथील दिव्या सुभाष देसाई या विद्यार्थिनीने साकारलेल्या प्रतापगडच्या प्रतिकृतीला प्रथम क्रमांक मिळाला.
किमया संतोष परब (सिंधुदुर्ग किल्ला), रणझुंजार ग्रुप (पद्मदुर्ग किल्ला) यांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविला. अरविंद आशुतोष भांगले (पुरंदर किल्ला) व प्रज्वल केसरकर, साईशा केसरकर (पन्हाळगड किल्ला) यांना उत्तेजनार्थ क्रमांक देण्यात आला.
या स्पर्धेत स्पर्धकांनी एकापेक्षा एक सरस किल्ल्यांच्या प्रतिकृती साकारल्या. स्पर्धेचे परीक्षण पत्रकार निलेश मोरजकर, आर्टिस्ट रणजित बांदेकर, शिक्षक सीताराम गवस यांनी केले. यावेळी लक्ष्मण कळंगुटकर, भूषण सावंत, तेजस परब, अमोल माळवदे, अनुज बांदेकर आदी उपस्थित होते. स्पर्धेतील प्रथम पाच क्रमांक विजेत्यांना रोख पारितोषिक, सन्मानपत्र व छत्रपती शिवाजी महाराज यांची मूर्ती देऊन गौरविण्यात येणार आहे. तर सहभागी झालेल्या सर्व स्पर्धकांना सन्मानपत्र व छत्रपती शिवाजी महाराज यांची मूर्ती देण्यात येणार आहे.
स्पर्धेचे पारितोषिक वितरण रविवार दिनांक १४ रोजी सकाळी साडेदहा वाजता विठ्ठल रखुमाई सभागृहात होणार असल्याचे संस्थेच्या वतीने कळविण्यात आले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)
संबंधित बातम्या
समान विभागातील बातम्या
बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात.
बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्...
बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात.
बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास...
सामाजिक जाणीवेसह कवी मनाचे उपक्रमशील शिक्षक मनोहर बसवंते यांचा २५ ऑक्टोबर रोजी नांदेड आकाशवाणीवर कार्यक्रम.
सामाजिक जाणीवेसह कवी मनाचे उपक्रमशील शिक्षक ...