ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
ओसरगांव येथे विठ्ठल रखुमाई मंदिरात हरिनाम सप्ताह व वार्षिक जत्रोत्सव.

ओसरगांव येथे विठ्ठल रखुमाई मंदिरात हरिनाम सप्ताह व वार्षिक जत्रोत्सव.

प्रकाशन: 10 Nov 2021 07:59 PM
वाचन संख्या 48

महेश जांभोरे प्रस्तुत व्हरायटी डान्स शो खास आकर्षण;बाळकृष्ण गोरे पारंपारिक लोककला दशावतारी नाट्यप्रयोग होणार..

कणकवली | उमेश परब : कणकवली तालुक्यातील ओसरगांव कानसळीवाडी येथे सोमवार १५ नोव्हेंबर २०२१ हरिनाम सप्ताह व वार्षिक जत्रोत्सव २०२१ चे आयोजन करण्यात आले आहे.
त्या निमित्ताने धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ८ वाजता विधिवत पुजा, सकाळी ९ वाजता घटस्थापना, सकाळी १० वाजता पासून स्थानिक भजने होणार आहेत. तसेच सायंकाळी ४ वाजल्यापासून : दिंड्या व भजने, बुधवार १७ नोव्हेंबर २०२१ वार्षिक जत्रौत्सव सकाळी ८ वाजता विधिवत पुजा, दुपारी १२ वाजता महाप्रसाद, रात्रौ ८ वाजता महेश जांभोरे प्रस्तुत व्हरायटी डान्स शो कलाविष्कार नव्या युगाचा, रात्रौ . १२ वाजता बाळकृष्ण गोरे पारंपारिक लोककला दशावतारी नाट्यमंडळाचा दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे. तरी सर्व भाविकांनी या सोहळ्याचा अवश्य लाभ घ्यावा,असे आवाहन विठ्ठल रखुमाई विकास मंडळ , ओसरगांव यांच्या वतीने करण्यात आले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स