अखेर कलमठच्या प्रकाश गांवकर यांच्या घरी नांदणार हक्काची वीज...!
शिवसेना उपजिल्हाप्रमुख सुजित जाधव आणि सहकार्यांच्या प्रयत्नांना सकारात्मक प्रतिसाद.
कणकवली | प्रतिनिधी : कलमठ येथील रहिवासी प्रकाश गांवकर यांनी बांधलेल्या नवीन घरात वीज कनेक्शन मिळावे म्हणून अथक परिश्रम घेतले होते. तरीही वीज मीटर न मिळाल्याने अखेर त्यांनी सामाजिक कार्यकर्ते तथा शिवसेना उपजिल्हाप्रमुख सुजित जाधव यांची भेट घेत घेतली सुजित जाधव यांच्या शिवसेना स्टाईलने दिलेल्या इशाऱ्यानुसार अनेक दिवस रखडलेला मीटर प्रस्ताव अखेर मान्य झाला आहे.
कलमठ येथील रहिवासी प्रकाश गांवकर यांना नवीन घरात वीज कनेक्शन देण्याबाबत कलमठ अभियंता चाल ढकल करत असल्याचे निदर्शनास आले त्यानंतर सुजित जाधव यांनी शिवसैनिकांसह वीज वितरण कार्यालयात धडक दिली व लवकरात लवकर गांवकर यांची मागणी पूर्ण न झाल्यास कार्यालयाला कुलुप ठोकणार असा इशारा यावेळी जाधव यांनी दिला होता. त्यानंतर मात्र कलमठ अभियंत्यांनी लागलीच कागदपत्र मागवत गांवकर यांचा नवीन मीटर साठीचा प्रस्ताव मान्य केला आहे. लवकरच गांवकर यांच्या नवीन घरात वीज येणार असल्याने ते खुश असून त्यांनी सुजित जाधव व शिवसैनिकांचे आभार मानले आहेत.
(फोटो : श्री सुजित जाधव यांच्या उपस्थितीत श्री.गांवकर यांनी दिलेल्या निवेदनाचा क्षण.)
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)