ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात एस टी कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन...!

सिंधुदुर्ग जिल्ह्यात एस टी कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन...!

प्रकाशन: 08 Nov 2021 11:36 AM
वाचन संख्या 80

किरकोळ गाड्या वगळता लालपरीचा वावर ठप्प…!

कणकवली | उमेश परब : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण व इतर मागण्यांसाठी राज्यभरात सुरू असलेल्या संपामध्ये सिंधुदुर्ग विभागातील कर्मचारीही सोमवारपासून उत्स्फूर्तपणे सहभागी झाले. कर्मचाऱ्यांनी सोमवारी सकाळपासून काम बंद आंदोलन सुरू केल्याने महामंडळाची वाहतूक व्यवस्था पूर्णतः कोलमडली होती.
विविध मागण्यांसाठी सर्व कर्मचारी संघटनांनी एकत्रित येत ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात बेमुदत उपोषण सुरू केले होते. यावेळी देण्यात आलेल्या आश्वासनानुसार उपोषण मागे घेण्यात आले असले तरीही महामंडळाचे शासनामध्ये विलिनीकरण करण्यात यावे ही कर्मचाऱ्यांची मागणी होती. त्यामुळे या मागणीसाठी गेले बारा दिवस राज्यभरात ठिकठिकाणी काम बंद सुरू करण्यात आले होते. सिंधुदुर्ग विभाग मात्र यात सहभागी झालेला नव्हता. परंतु सर्व कर्मचाऱ्यांनी एकत्रित येत सोमवारी सकाळपासून काम बंद आंदोलन सुरू केल्याने एसटी महामंडळाची संपूर्ण वाहतूक व्यवस्था ठप्प झाली. येथील बसस्थानकात कर्मचाऱ्यांनी एकत्रित येत महामंडळाचे शासनात विलीनीकरण झालेच पाहिजे यासाठी जोरदार घोषणाबाजीही केली. रा.प. महामंडळाच्या सूत्रांची संपर्क साधला असता सिंधुदुर्ग विभागामध्ये सोमवारी सकाळपासून कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन सुरू केल्याने महामंडळाची वाहतूक व्यवस्था पूर्णत कोलमडली असल्याचे सांगण्यात आले. यामुळे सकाळच्या सत्रात शासकीय सेवेत जाण्यासाठी बसस्थानकावर आलेल्या कर्मचाऱ्यांची मोठी गैरसोय झाली. दरम्यान सकाळच्या सत्रात विजयदुर्ग आगारातील काही किरकोळ बसेस वगळता संपूर्ण वाहतूक ठप्प झाली असल्याचे महामंडळाच्या सूत्रांनी सांगितले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स