ताज्या बातम्या
महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान. साहित्यिक दीपक पटेकर यांना मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान, मुंबईचा सर्वोत्कृष्ट गद्य स्तंभलेखन पुरस्कार प्रदान. मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम २६ ऑक्टोबर रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर.
ओव्हरटेकच्या नादात वागदेत ट्रक-डंपरचा अपघात...!
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

ओव्हरटेकच्या नादात वागदेत ट्रक-डंपरचा अपघात...!

प्रकाशन: 08 Nov 2021 10:11 AM
वाचन संख्या 132

दोन्ही वाहनांच्या दर्शनी भागाचे नुकसान ; सुदैवाने कोणी जखमी नाही

कणकवली | उमेश परब : कणकवली ते असरोंडी मार्गाने जात असणाऱ्या ट्रक व डंपर चा ओव्हरटेक करण्याच्या नादात अपघात झाला. ओव्हरटेक करत असताना डंपर व ट्रक एकमेकांना घासून डिव्हायडर क्रॉस करत महामार्गाच्या दुसऱ्या लेन वर येऊन थांबले. या अपघातामुळे दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, सुदैवाने कुणालाही दुखापत झाली नाही. हा अपघात सोमवारी सकाळी पावणे आठ वाजण्याच्या सुमारास वागदे हॉटेल रेड चिली जवळ घडला. अपघातानंतर वागदे ग्रामस्थांसह वाहतूक पोलिस एस. के. कदम, ए. जे. भुतेलो, एस. एस. करवंजे, व्ही. जि. देसाई यांनी घटनास्थळी धाव घेतली. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार भरधाव वेगाने कुडाळ च्या दिशेने जाणारे ट्रक व डंपर ओव्हरेटेक करत असताना एकमेकांना घासले. व त्याच वेगाने ते महामार्गाच्या कणकवली कडे वाहने येणाऱ्या लेन वर येऊन थांबले. सुदैवाने या लेन वरून कणकवलीच्या दिशेने त्याच वेळी वाहने येत नसल्याने सुदैवाने मोठा अपघात टळला. अपघातानंतर वाहतूक पोलिसांनी काही वेळातच अपघातस्थळी धाव घेत दोन्ही वाहने महामार्गावरून बाजूला करत वाहतूक सुरळीत केली.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स