ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
कणकवलीच्या विकासासाठी व्यक्तिशः कटिबद्ध असल्याची नगराध्यक्ष समीर नलावडे यांची ग्वाही..!

कणकवलीच्या विकासासाठी व्यक्तिशः कटिबद्ध असल्याची नगराध्यक्ष समीर नलावडे यांची ग्वाही..!

प्रकाशन: 05 Nov 2021 02:15 PM
वाचन संख्या 41

वरचीवाडी येथील रस्त्याचे काम सुरू…!

कणकवली | उमेश परब : शहरातील वरचीवाडी नरडवे रोड ते पोतदार स्कूलकडे जाणार्‍या रस्त्याच्या खडीकरण व डांबरीकरणाचे सुरू करण्यात आले आहे. या कामाचे उद्घाटन सिंधुदुर्ग जिल्हा भाजपचे उपाध्यक्ष तथा माजी जि.प.अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत यांच्या हस्ते करण्यात आले.तसेच उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांनी गोट्या सावंत यांचे पुष्पगुच्छ देत स्वागत केले.
यावेळी नगराध्यक्ष समीर नलावडे, उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, न.पं.च्या आरोग्य समितीचे सभापती संजय कामतेकर, बांधकाम समितीचे सभापती अ‍ॅड विराज भोसले,माजी तालुकाध्यक्ष सुरेश सावंत, नगरसेवक अभिजीत मुसळे, रवींद्र गायकवाड,नगरसेविका कविता सावंत, माजी नगरसेवक किशोर राणे, बंडू गांगण, संदीप राणे, जावेद शेख, अनिल पवार, आबा पिळणकर, आबा केरकर, संजना सदडेकर, राजू पिळणकर, विशाल आमडोस्कर, महेश आमडोस्कर, श्यामा आमडोस्कर, बाळा सावंत, सुधीर धुमाळे, संजय सदडेकर,रमेश पारकर,बाबू गुरव आदी उपस्थित होते.
कणकवली विकासासाठी मी कटिबद्ध आहे. शहरातील दळणवळणच्या सुविधा होण्यासाठी चांगले रस्ते निर्माण करण्याचे काम न.पं.च्या माध्यमातून केले जात आहे. यापुढील काळात या रस्त्यालगत स्ट्रीट लाईटचे काम मार्गी लावण्यात येईल. तसेच शहरात होणार्‍या विकासकामांना नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी केले. हा रस्ता नगरोत्थान योजनेमधून करण्यात येत असून या कामासाठी ५४ लाख ५० हजार एवढा खर्च करण्यात येणार आहे. या कामातंर्गत रस्त्यालगत दोन्हीबाजुंना आसीसी काँक्रीटचे गटार तयार केले जाणार आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स