ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
मुंबई येथे झालेल्या रॅम्प वॉक स्पर्धेत वैशाली पुरी ठरली विजेती...!

मुंबई येथे झालेल्या रॅम्प वॉक स्पर्धेत वैशाली पुरी ठरली विजेती...!

प्रकाशन: 05 Nov 2021 03:29 PM
वाचन संख्या 51

प्रियांका काकडे आणि स्वाती नलावडे अनुक्रमे द्वितीय व तृतीय स्थानी

कोकण कला व शिक्षण संस्थेचे आयोजन

बांदा | राकेश परब : कोकण कला व शिक्षण विकास संस्थेच्या माध्यमातून गेली १० वर्षे सामाजिक, वैद्यकीय, शैक्षणिक, महिला सक्षमिकरण अशा सर्वच क्षेत्रात वेगवेगळे उपक्रम करण्यात येतात. संस्थेच्या दहाव्या वर्धापनदिनानीमित्त ३१ ऑक्टोबरला आयोजित मुंबईतील रॅम्प वॉक स्पर्धेला स्पर्धकांनी भरभरून प्रतिसाद दिला.
कोरोना काळात सर्व नियमाचे पालन करून संस्थेने दादर, मुंबई येथे संस्थेच्या माध्यमातून रॅम्प वॉक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.यात शेकडो युवतींनी उत्स्फूर्त सहभाग दर्शवला.यावेळी घेण्यात आलेल्या रॅम्प वॉक स्पर्धेत वैशाली पुरी प्रथम, प्रियांका काकडेनी द्वितीय तर स्वाती नलावडे हिने त्रितीय क्रमांक पटकावला. योगिता निजामकर आणि तारा सांगळे यांनी या स्पर्धेचे परीक्षक म्हणून काम पाहिले तर बक्षिस वितरण संस्थेचे अध्यक्ष दयानंद कुबल यांच्या हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमाला सुरज कदम, शशांक सावंत, सचिन धोपट, रामचंद्र पाटील, योगेश गवाळे, नलिनी चव्हाण, श्वेता सावंत, सिंड्रेला जोसेफ, बापू माने, साक्षी धोपट आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अक्षय ओवळे यांनी तर आभार संस्थाध्यक्ष श्री. दयानंद कुबल यांनी मानले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स