ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
शासन निर्णयाची अंमलबजावणी होत नसल्याने संपादक संघटनेवर उपोषणाची वेळ

शासन निर्णयाची अंमलबजावणी होत नसल्याने संपादक संघटनेवर उपोषणाची वेळ

प्रकाशन: 07 Aug 2021 02:34 PM
वाचन संख्या 60

कणकवली | उमेश परब : सामान्य प्रशासन विभागाने शासन निर्णयानुसार जाहिरात धोरण ठरवून दिलले असताना जिल्हयातील नगरपालिका, नगरपरिषदा, नगरपंचायती तसेच ग्रामपंचायती शासन आदेशाची अंमलबजावणी करत नाहीत. जिल्ह्यातील अधिकृत शासन यादीवरील साप्ताहिकांना जाहिराती देणे बंधनकारक असताना त्या दिल्या जात नाहीत. सदरच्या जाहिराती मिळाव्यात म्हणून सिंधुदुर्ग जिल्हा सप्ताहिक वृत्तपत्र संपादक संघ गेली अनेक वर्षे प्रयत्न करत आहेत. परंतु, आश्वासनापलिकडे काही होत नाही. म्हणून सिंधुदुर्ग जिल्हा साप्ताहिक वृत्तपत्र संपादक संघ या संघटनेने १५ ऑगस्ट २०२१ रोजी स्वातंत्र्यदिनी उपोषणास बसण्याचा निर्णय घेतला आहे. छोटी वृत्तपत्रे जगली पाहिजेत, म्हणून त्यांना शासनाकडून जाहिराती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. असे असताना शासनाच्या निर्णयाचा चूकीचा अर्थ लावून शासनाच्या जाहिराती चूकीच्या पद्धतीने वितरीत केल्या जातात. जिल्हा माहिती अधिकारी यांनी यात बदल व्हावा, म्हणून शासनाच्या निर्णयाबाबत अनेकवेळा पत्रव्यवहार करूनही त्याची योग्य अंमलबजावणी झालेली नाही. यामध्ये सुधारणा व्हावी म्हणून संघटनेने उपोषणाचा निर्णय घेतला आहे . संपादक संघटनेच्यावतीने दि . ९ व २६ जुलै रोजी पालकमंत्री, जिल्हाधिकारी, जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे संघटनेच्यावतीने निवेदन दिले होते. पालकमंत्र्यांनी प्रत्यक्ष भेटीवेळी अधिकाऱ्यांना कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या. यापुर्वीच्या पालकमंत्र्यांनीही अशी भूमिका घेतली होती. परंतु, जाहिरात धोरणात काहीच बदल झाला नसल्यामुळे नाईलाजाने संपादक संघटनेला हा निर्णय घ्यावा लागला आहे. संपादक संघटनेच्या उपोषणाच्या निर्णयाला सर्व स्तरातून मोठ्या प्रमाणात पाठींबा मिळत असून संघटना उपोषणाच्या निर्णयावर ठाम आहे, अशी माहिती संघटनेचे अध्यक्ष नितीन तळेकर व सचिव दिलीप हिंदळेकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे दिली आहे .

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स