ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
रेंबवली येथील मुख्य विद्युत वाहिनी डीपी धोकादायक स्थितीत..

रेंबवली येथील मुख्य विद्युत वाहिनी डीपी धोकादायक स्थितीत..

प्रकाशन: 07 Aug 2021 02:53 PM
वाचन संख्या 137

शिरगांव | संतोष साळसकर : देवगड तालुक्यातील रेंबवली येथील  प्राथमिक शाळेजवळील मुख्य विद्युत  वाहिनीच्या डीपी वरील प्रवाहित होणाऱ्या वाहिनीच्या तारांना कोटिंग नसल्यामुळे याठिकाणी कोणत्याही क्षणी जीवित हानी होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.याबाबत ग्रामस्थांनी वेळोवेळी संबंधित विभागाशी पाठपुरावा करूनही अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही करण्यात न आल्याने गुरा-ढोरांना, माणसांना धोकादायक झाली आहे.रेंबवली हे गाव देवगड तालुक्याच्या एका टोकाला असून मालवण तालुक्याला लागून आहे.या गावाची कुवळे गावात आहे. डोंगराळ भागात हे गाव वसलेले आहे.या गावाला विद्युत पुरवठा करणारी मुख्य विद्युत डीपी ही प्राथमिक शाळेनजीक आहे.ही मुख्य डीपी देखील नादुरुस्त अवस्थेत आहे.या डीपीवरून प्रवाहित होणाऱ्या सर्व तारांचे प्लॅस्टिक कोटिंग पूर्णतः निघालेले असल्याने या उघड्या तारांना कुणाचा स्पर्श झाला तर मोठी जीवित हानी होऊ शकते. बाजूला खूप झाडी-झुडपी वाढलेली आहेत.त्यामुळे या ठिकाणी गुरे चरावयास आल्यास किव्हा कुना व्यक्तीचा चुकून तारांना स्पर्श झाल्यास मोठा अनर्थ घडू शकतो.
नुकत्याच झालेल्या तौक्ते वादळामध्ये  या भागातील विद्युतवाहिनीचे खूप मोठ्याप्रमाणात नुकसान झाले होते. त्यावेळी या मुख्य डीपीची दुरुस्तीसाठी येथील माजी जि. प.सदस्य सुभाष नार्वेकर,तसेच ग्रामस्थांनी संबंधित विभागाला लेखी कळऊनही अद्याप काही कार्यवाही झालेली नाही.तरी तात्काळ या डीपीची  दुरुस्ती व्हावी अशी मागणी होत आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स