ताज्या बातम्या
महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान. साहित्यिक दीपक पटेकर यांना मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान, मुंबईचा सर्वोत्कृष्ट गद्य स्तंभलेखन पुरस्कार प्रदान. मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम २६ ऑक्टोबर रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर.
युवा रक्तदाते पंचक्रोशी आडवली रक्तदानाला उत्स्फूर्त प्रतिसाद
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

युवा रक्तदाते पंचक्रोशी आडवली रक्तदानाला उत्स्फूर्त प्रतिसाद

प्रकाशन: 07 Aug 2021 12:28 PM
वाचन संख्या 92

दोन दुर्मिळ (O-व A-) रक्तगट दात्यांनी केले रक्तदान.

लखन बांदिवडेकर यांनी केले २८ व्या वेळी रक्तदान.

  चिंदर । विवेक परब : "रक्तदान श्रेष्ठ दान" या उक्ती प्रमाणे युवा रक्तदाते पंचक्रोशी आडवली यांच्या पुढाकाराने व जिल्हा ब्लड बँक यांच्या सहकार्याने  आयोजित रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला, शिबिराला ३४ रक्त दात्यांनी रक्तदान केले. त्यामध्ये दोन दुर्मिळ (O-वA-) रक्तगट दात्यांनी रक्तदान केले तसेच बांदिवडे येथील युवा उद्योजक लखन बांदिवडेकर यांनी आपल्या जिवनात २८ व्यावेळी रक्तदान केले संस्थेच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.
       आडवली सुभाष  विद्यालय येथे रक्तदान शिबिर पार पडले. उद्घाटन डॉ बेळणेकर यांच्या हस्ते झाले  यासाठी गणेश मालंडकर, तुषार चव्हाण, विनायक भिडे, प्रणय चव्हाण, सचिन लाड, प्रथमेश परब यांनी मेहनत घेतली. संस्थेच्या वतीने सर्व रक्त दात्यांचे आभार मानण्यात आले आहेत.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स