ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
विहिरीत बिबट्या.!

विहिरीत बिबट्या.!

प्रकाशन: 31 Oct 2021 07:14 PM
वाचन संख्या 85

मसुरे | सौ.प्राजक्ता पेडणेकर : भक्ष्याच्या वेध घेत टाकलेली उडी चुकली आणि बिबट्या थेट विहिरीत पडल्याची घटना रविवारी पहाटे घडली. ग्रामस्थनी वन विभागाला कळविले नंतर वन विभागाने रेस्क्यू ऑपरेशन करत या बिबट्याला सुखरूप त्याच्या अधिवासात सोडलं.
रविवारी पहाटे कुडाळ तालुक्यातील वालावल गाळणीवाडी येथील विहिरीमध्ये बिबटा पडल्याचे स्थानिक ग्रामस्थ शेखर परब यांनी मंदार गाळवणकर यांच्या माध्यमातून वनपरिक्षेत्र अधिकारी श्री अमृत शिंदे यांना कळविल्यानंतर वनविभागाचे बचाव पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. तत्पूर्वी वनपरिक्षेत्र अधिकारी कुडाळ श्री. शिंदे यांनी केलेल्या मार्गदर्शना नुसार ग्रामस्थानी विहिरीमध्ये फळी व ओंडका सोडलेने बिबटा त्यावर बसून राहिला. त्यानंतर बचाव पथकाने http://localhost/news/public/uploads/20 ते 25 फूट खोल विहिरीमध्ये पिंजरा सोडत ग्रामस्थांच्या मदतीने त्याला पिंजऱ्यात घेत सुखरुप बाहेर काढण्यात आले. भक्ष्याच्या मागे धावत असताना तो विहिरीत पडला असावा असे वनविभागाच्या वतीने सांगण्यात आले.
सदर बिबट्या हा नर जातीचा असून अंदाजे 2 वर्षे वयाचा आहे. पशु वैद्यकीय अधिकारी यांचेकडून त्याची वैद्यकीय तपासणी करून त्यास नैसर्गिक अधिवासात मुक्त करणेत आले.
यावेळी वनपरिक्षेत्र अधिकारी श्री. शिंदे म्हणाले,बिबट वन्यप्राणी हा निशाचर असून बहुतांशी भक्ष्याच्या शोधात तो रात्री बाहेर पडतो. बिबट्याच्या नैसर्गिक अधिवासामध्ये आढळनारे प्राणी जसे बेडूक, उंदीर, घुशी, ससे, साळींदर, घोरपड, पक्षी, माकडे यांपासून ते लहान आकाराची हरणे यांवरती ते उपजीविका करतात. बिबट हा अन्नसाखळीच्या सर्वोच्च स्थानी असून परिसंस्थेचा समतोल राखण्यासाठी महत्वाचा घटक आहे.
कोणताही वन्यप्राणी जखमी अथवा अडकलेल्या स्थितीत आढळून आल्यास तात्काळ वनविभागास माहिती द्यावी अस आवाहनही करणेत आले.
सदर बचावकार्य उपवनसंरक्षक (प्रा.) सावंतवाडी श्री. शहाजी नारनवर व सहाय्यक वनसंरक्षक (खाकुतो व वन्यजीव) सावंतवाडी श्री. आय. डी. जालगावकर यांचे मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी, कुडाळ श्री. अमृत शिंदे, वनपाल नेरूर त हवेली धुळु कोळेकर, वनरक्षक नेरूर त हवेली सावळा कांबळे, वनरक्षक मठ सुर्यकांत सावंत तसेच निवती पोलीस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक संकेत पगडे,पोलीस हेड कॉन्स्टेबल दिपक गावडे, एस बी नाईक, पोलीस पाटील उमेश शृंगारे यांनी स्थानिक ग्रामस्थ अतुल बंगे, मनोहर कानडे, दयानंद परब, राहुल मयेकर यांनी यशस्वी केले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स