ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
सावंतवाडीत युवासेनेची सायकल रॅली...!

सावंतवाडीत युवासेनेची सायकल रॅली...!

प्रकाशन: 31 Oct 2021 08:53 PM
वाचन संख्या 49

केंद्र सरकारच्या पेट्रोलियम भाववाढीनिषेधार्थ घोषणा..!

सावंतवाडी | लविना डिसोज़ा : केंद्र सरकारकडून होत असलेल्या पेट्रोलियम पदार्थांच्या भाववाढीनिषेधार्थ सावंतवाडी तालुका युवा सेनेच्या वतीने शहरात आज सायकल रॅली काढून केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.
‘हेच का ते अच्छे दिन’ असे म्हणत तसेच फराळाचे वाटून केंद्र सरकारबद्दल निषेध व्यक्त करण्यात आला. देशात पेट्रोल, डिझेल, खाद्यतेल गॅस आदी विविध वस्तुचे दर मोठ्या प्रमाणात वाढल्याने सर्वसामान्य हतबल झाले आहे. महागाईने सर्वजण त्रस्त झाले असून राज्यात केंद्र सरकार विरोधात युवा सेनेकडून राज्यव्यापी आंदोलन हाती घेण्यात आले.सावंतवाडी शहरांत युवा सेनेच्या माध्यमातून पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत केंद्र सरकारचा निषेध व्यक्त करत आंदोलन करण्यात आले. यावेळी आमदार दीपक केसरकरदेखील विशेष उपस्थित होते. यावेळी युवासेना उपजिल्हाधिकारी सागर नाणोसकर, युवासेना तालुका समन्वयक गुणाजी गावडे, युवासेना तालुका प्रमुख योगेश नाईक, विनायक सावंत, शिवसेना तालुका प्रमुख रुपेश राऊळ, शहर अध्यक्ष बाबू कुडतरकर, नगरसेविका अनारोजिन लोबो, माधुरी वाडकर, भारती मोरे, दिपाली सावंत, नगरसेवक सुरेंद्र बांदेकर, उपजिल्हाप्रमुख अशोक दळवी शिवसेना प्रवक्ते डॉक्टर जेपेद्र परूळेकर माजी नगरसेवक सुरेश भोगटे, गजानन नाटेकर, अब्जू सावंत, एकनाथ नारोजी, बबन राणे, आदित्य आरेकर, संजय तानावडे, रश्मी माळवदे आधी मोठ्या संख्येने युवासेना पदाधिकारी तसेच असंख्य शिवसेना कार्यकर्ते उपस्थित होते.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स