ताज्या बातम्या
महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान. साहित्यिक दीपक पटेकर यांना मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान, मुंबईचा सर्वोत्कृष्ट गद्य स्तंभलेखन पुरस्कार प्रदान. मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम २६ ऑक्टोबर रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर.
अखेर गडनदीवर किर्लोस येथे होणार पूल...!
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

अखेर गडनदीवर किर्लोस येथे होणार पूल...!

प्रकाशन: 30 Oct 2021 06:54 PM
वाचन संख्या 75

ग्रामस्थांनी आम. वैभव नाईक यांचे मानले आभार

कणकवली | उमेश परब : कणकवली-आचरा मार्गावरील गाव किर्लोस,शिरवंडे गावाशी जोडण्याचा मार्ग मोकळा झाला असून किर्लोस गडनदी येथे पूल मंजूर करण्यात आला आहे. मालवण तालुक्यात मोडणाऱ्या गडनदीवर किर्लोस बंधाऱ्याच्या जवळ 120 मीटर लांबीचा व 8 कोटी 28 लाख रक्कम खर्च असलेला मोठा पूल मंजूर झाला असून निविदा प्रक्रिया झाली आहे. सदर पूल व्हावा अशी ग्रामस्थांची अनेक दिवसांची मागणी होती. या पुलामुळे आचरा मार्गावरील अनेक गाव किर्लोस, असगणी, शिरवंडे, असरोंडी व अन्य गावांशी जोडले जाणार आहेत .हीपुलाची मागणी पुन्हा पूर्ण केल्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच कुडाळ मालवण मतदार संघाचे आमदार वैभव नाईक , खास.विनायक राऊत ,पालकमंत्री नाम.उदय सामंत यांचे किर्लोस व पंचक्रोशीतर्फे आभार किर्लोस गावचे सरपंच प्रदीप सावंत, उपसरपंच दीपक किर्लोस्कर,माजी सरपंच पंढरी घाडीगांवकर, शिवसेना मालवण उपतालुकाप्रमुख बाबा सावंत,विकास लाड व इतरांनी मानले असून आम.वैभव नाईक यांची भेट घेत आभार व्यक्त केले आहेत.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स