राज्य हिवताप निर्मूलन कर्मचारी संघटना शाखा सिंधुदुर्ग यांच्या वतीने जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांना निवेदन..
कणकवली | उमेश परब : महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागकडुन आरोग्य सेवेतील ग्रामीण भागात आरोग्य उपकेंद्राच्या माध्यमातून आरोग्य कर्मचारी पदोन्नती बाबत अमूलाग्र बदल करण्यात आले आहेत. हे बदल जाचक असून त्यात सुधारणा करण्यात यावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य हिवताप निर्मूलन कर्मचारी संघटना शाखा सिंधुदुर्ग यांच्या वतीने जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांना करण्यात आली आहे.
यापूर्वी दहावी पास असलेल्या कर्मचाऱ्यांना पदोन्नती साठी निवडले जात होते मात्र आता याची शैक्षणिक पात्रता दहावी वरून थेट बीएससी ची अट शासनाने घातली आहे. ही अट जाचक असून यात बदल करण्यात यावा अन्यथा कर्मचाऱ्यांना बीएससी करण्यासाठीची व्यवस्था करण्यात यावी अशी मागणी यामुळे सुमारे तीन हजार कर्मचारी जे पदोन्नती व आर्थिक लाभापासून वंचित राहणार आहेत त्यांना या प्रक्रियेत सहभागी होता येईल. अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. यावेळी महाराष्ट्र राज्य हिवताप निर्मूलन कर्मचारी संघटना शाखा सिंधुदुर्गचे पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)