ताज्या बातम्या
महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान. साहित्यिक दीपक पटेकर यांना मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान, मुंबईचा सर्वोत्कृष्ट गद्य स्तंभलेखन पुरस्कार प्रदान. मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम २६ ऑक्टोबर रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर.
केंद्रीय मंत्री नारायण राणे ​२६​ ऑगस्ट रोजी सिंधुदुर्गात
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

केंद्रीय मंत्री नारायण राणे ​२६​ ऑगस्ट रोजी सिंधुदुर्गात

प्रकाशन: 06 Aug 2021 07:35 PM
वाचन संख्या 106

सिंधुदुर्ग जन आशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून मुंबई ते सिंधुदुर्ग नारायण राणे यांच्या झंझावती दौरा जन आशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून मुंबई ते सिंधुदुर्ग नारायण राणे यांच्या झंझावती दौरा

केंद्रीय मंत्री झाल्यानंतर राणेंची सिंधुदुर्गात प्रथमच होणार दमदार एंट्री

कणकवली / उमेश परब : केंद्रीय सूक्ष्म लघु व मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे हे केंद्रीय मंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर प्रथमच सिंधुदुर्ग जिल्ह्यात येणार आहेत. त्‍यांचा दौरा हा जन आशीर्वाद यात्रा च्या माध्यमातून मुंबई ते सिंधुदुर्ग असा जाहीर करण्यात आला आहे. 19 ते 26 ऑगस्ट असा सात दिवसाचा हा दौरा असून, जन आशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून केंद्रीय कॅबिनेट मंत्री नारायण राणे हे कार्यकर्ते व जनतेच्या गाठीभेटी घेत केंद्रीय मंत्री झाल्यानंतर 26 ऑगस्ट रोजी आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाखल होणार आहेत. 19 ऑगस्ट रोजी नारायण राणे सकाळी 10 वाजता मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज विमानतळावर दाखल होणार आहेत. ते रात्री जुहू येथे निवास्थानी थांबल्यानंतर http://localhost/news/public/uploads/20 ऑगस्ट रोजी मुंबई उपनगरात ही जन आशीर्वाद यात्रा दाखल होणार आहे. त्यानंतर 21 ऑगस्ट रोजी वसई-विरार येथे ही जन आशीर्वाद यात्रा दाखल होणार असून, तेथून 22 ऑगस्ट रोजी नारळी पौर्णिमा व रक्षाबंधनानिमित्त ही यात्रा स्थगित राहणार आहे. 23 ऑगस्ट रोजी दक्षिण रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर नारायण राणे व जन आशीर्वाद यात्रा रवाना होणार आहे. या दिवशी रात्री चिपळूण शहरात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा मुक्काम असणार आहे. तर 24 ऑगस्ट रोजी उत्तर रत्नागिरी जिल्ह्याच्या दिशेने यात्रा रवाना होणार आहे. त्यानंतर रात्री रत्नागिरी शहरात नारायण राणे व जनआशिर्वाद यात्रेतील मान्यवरांचा मुक्काम असणार आहे. 25 ऑगस्ट रोजी दक्षिण रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्या नंतर नारायण राणे सिंधुदुर्ग जिल्ह्यात रात्री दाखल होणार आहेत. व कणकवली येथील ओम गणेश निवासस्थानी त्यांचा मुक्काम असणार आहे. 26 ऑगस्ट रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यात जन आशीर्वाद यात्रा असणार असून यावेळी या संपूर्ण दौर्‍यात भाजपाचे विविध स्तरातील पदाधिकारी कार्यकर्ते व जनतेच्या गाठीभेटी केंद्रीय मंत्री नारायण राणे घेणार आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात 26 ऑगस्ट रोजी या जन आशीर्वाद यात्रेचा समारोप होणार आहे. या संपूर्ण जन आशीर्वाद यात्रेच्या दौऱ्यात मुंबई ते सिंधुदुर्ग पर्यंत यात्रा प्रमुख म्हणून माजी आमदार तथा भाजपाचे प्रदेश सरचिटणीस प्रमोद जठार यांच्यावर पक्षांने जबाबदारी दिली आहे. तर या भाजपा महाराष्ट्र प्रदेश च्या जन आशीर्वाद यात्रे चे यात्रा संयोजक म्हणून आमदार संजय केळकर यांच्यावर जबाबदारी देण्यात आली आहे. तर मुंबई ते सिंधुदुर्ग पर्यंत प्रत्येक विभाग निहाय दौरा सह प्रमुख म्हणून तेथील जिल्हाध्यक्ष, आमदार यांच्यावर जबाबदारी असणार आहे. अशी माहिती भाजपा कडून देण्यात आली.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स