ताज्या बातम्या
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप.
कांदळगाव श्री देव रामेश्वर देवस्थानचा 'वेशी फिरणे' कार्यक्रमाची उत्साहपूर्ण सुरवात.

कांदळगाव श्री देव रामेश्वर देवस्थानचा 'वेशी फिरणे' कार्यक्रमाची उत्साहपूर्ण सुरवात.

प्रकाशन: 09 Feb 2025 09:15 PM
वाचन संख्या 355

देवाच्या स्वागतार्थ भाविकांचा उत्साह ; कांदळगाव – ओझर – कोळंब मार्गावर दुतर्फा रांगोळी आणि भगव्या ध्वजांसह गुढ्या.

मालवण : तालुक्यातील कांदळगाव येथील श्री देव रामेश्वर देवस्थानचा पूर्वापार परंपरेनुसार स्वयंभू देव रामेश्वर पालखी, तरंग, राणे – परब मानकरी व रयत मंडळीसह ‘वेशी फिरणे’ कार्यक्रम ( २०२५) ला ९ फेब्रुवारी रोजी दुपारपासून सुरुवात झाली. कांदळगाव येथील रामेश्वर मंदिर येथून श्री देव रामेश्वराने पालखीत बसून देव तरंग, राणे – परब व रयतेसह वेशी फिरणे कार्यक्रमासाठी प्रस्थान केले. देवाच्या स्वागतासाठी कांदळगाव – ओझर – कोळंब मार्गावर भाविकांनी भव्य रांगोळ्या काढल्या होत्या आणि रस्त्याच्या दुतर्फा भगवे ध्वज फडकवत गुढ्या देखील उभारल्या होत्या.

श्री देव रामेश्वर मंदिरातून प्रस्थान केल्यावर भाविकांनी संपूर्ण मार्गावर ठिकठिकाणी स्वागत केले. श्री देव रामेश्वर ओझर नाक्यावर दाखल झाल्यावर त्याठिकाणी भाविकांकडून उत्स्फूर्तपणे स्वागत करण्यात आले. त्यानंतर कोळंब खडवण नाका येथे भाविकांकडून भव्य स्वागत करण्यात आले. यावेळी उपस्थित शेकडो भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला. या दरम्यान ओझर येथे डंपर व वाळू व्यावसायिकांच्या वतीने भाविकांना शीतपेय, लाडू आणि अल्पोपहाराचे वाटण्यात आला.

सायंकाळी श्री देव रामेश्वर कोळंब मांगरी येथे भेटीस आल्यानंतर भाविकांकडून स्वागत करण्यात आले. या सोहळ्यात मोठ्या संख्येने भाविक सहभागी झाले होते. देवस्थान ट्रस्ट पदाधिकारी, विश्वस्त सदस्य, राणे – परब मानकरी व कांदळगाव ग्रामस्थ सहभागी झाले.

सोहळ्यात उद्या दि. १० फेब्रुवारी रोजी कोळंब मांगरी येथील देव महापुरुष येथे दुपारी महाप्रसाद, दुपारनंतर न्हिवे येथे प्रस्थान करणार आहे. दि. ११ रोजी न्हिवे येथे दुपारी महाप्रसाद, दुपारनंतर महान येथे प्रस्थान, १२ रोजी दुपारी महान गांगेश्वर मंदिर येथे महाप्रसाद, दुपारनंतर कांदळगाव रवळनाथ मंदिरकडे प्रस्थान, १३ रोजी सकाळी रवळनाथ मंदिरातून कांदळगाव साळकरवाडी येथे प्रस्थान, तेथून पुन्हा माघारी येताना परबवाडी मोठ्या तुळशीजवळ महाप्रसाद, दुपारनंतर रवळनाथ मंदिराकडे प्रस्थान, १४ रोजी रवळनाथ मंदिर येथून राणेवाडी येथे प्रस्थान, दुपारी राणेवाडी मध्यवर्ती मोठी तुळस येथे महाप्रसाद, दुपारनंतर रामेश्वर मंदिर येथे रवाना, रात्री रामेश्वर मंदिर येथे पाच दिवसीय वेशी फिरणे कार्यक्रमाची रितीरिवाजानुसार सांगता करण्यात येणार आहे. कार्यक्रमाला भाविकांनी उपस्थित रहायचे आवाहन कांदळगाव रामेश्वर देवस्थान तर्फे करण्यात आले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स