ताज्या बातम्या
नाशिकवासियांची प्रतिक्षा संपली..! जिल्ह्यातील आरोग्य संस्थांमध्ये २७ ऑक्टोबर रोजी ‘कायाकल्प' उपक्रम. शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या हस्ते विद्युत रोहीत्र लोकार्पीत. निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली कुणबी - मराठा जात प्रमाणपत्र पडताळणीचा आढावा. मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचा ॲथलीट कु. सोहम चव्हाण याची विभागीय स्पर्धेच्या पात्रतेची 'उंच उडी...!' सामाजिक जाणीवेसह कवी मनाचे उपक्रमशील शिक्षक मनोहर बसवंते यांचा २५ ऑक्टोबर रोजी नांदेड आकाशवाणीवर कार्यक्रम. प्रिया मयेकर यांना राज्यस्तरीय शिक्षण रत्न पुरस्कार प्रदान. तृतीयपंथीय व्यक्तींच्या समस्या व तक्रारींच्या निराकरणासाठी गठीत जिल्हास्तरीय तक्रार निवारण समितीची आढावा बैठक संपन्न. ज्येष्ठ नागरिकांसाठी प्रत्येक तालुक्यात विरंगुळा केंद्र सुरू करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश. 'दुकानदारांनो सावधान...!'
शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या हस्ते विद्युत रोहीत्र लोकार्पीत.
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या हस्ते विद्युत रोहीत्र लोकार्पीत.

शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या हस्ते विद्युत रोहीत्र लोकार्पीत. 

Article image

मालवण | ब्यूरो न्यूज : आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून प्राप्त निधीतून वायरी मारुती मंदिर परिसरात उभारणी करण्यात आलेल्या विद्युत रोहित्र (ट्रान्सफॉर्मर) चे लोकार्पण शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. यावेळी मालवण नगराध्यक्षा सौ. ममता वराडकर, नगरसेवक मान्यवर, पदाधिकारी उपस्थित होते.


परिसरातील कमी दाबाचा वीज पुरवठा व अन्य वीज समस्या सोडवण्याच्या दृष्टीने उपनगराध्यक्ष दिपक पाटकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण, समाजकल्याण सभापती सिद्धार्थ जाधव, नगरसेविका नीना मुंबरकर, स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी पाठपुरावा केला. वीज ट्रान्सफॉर्मर उभारणी झाल्याबाबत तसेच दिलेला शब्द पूर्ण केल्याबद्दल नागरिकांच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले आहेत. यापूर्वी सातेरी देवी मंदिर मार्ग येथेही विद्युत ट्रान्सफॉर्मरची उभारणी करण्यात आली.


यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, उपजिल्हाप्रमुख विश्वास गावकर, नगराध्यक्षा ममता वराडकर, उपनगराध्यक्ष दिपक पाटकर, माजी नगराध्यक्ष तथा स्वीकृत नगरसेवक महेश कांदळगांवकर यांच्यासह शिवसेना शहरप्रमुख राजू बिडये, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण, बांधकाम सभापती सहदेव बापर्डेकर, समाजकल्याण सभापती सिद्धार्थ जाधव, नगरसेविका नीना मुंबरकर, नगरसेविका भाग्यश्री मयेकर, नगरसेविका अश्विनी कांदळगांवकर, मच्छिमार आघाडी तालुकाप्रमुख भाऊ मोरजे, अवी सामंत, सूर्यकांत फणसेकर, संदेश चव्हाण, श्रीकांत वेंगुर्लेकर, साई बांबूळकर, बंड्या गांवकर, पुजा खराडकर, सौ. बांबूळकर, गोविंद गांवकर, विरेश चव्हाण, योगेश गवंडी, विजय आडेकर, दिलीप नाईक, साईराज चव्हाण, साहील जाधव, बबलु गांवकर, तेजस लुडबे, नंदू देसाई, गणेश परब व स्थानिक नागरिक उपस्थित होते.


आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून शहर विकासाला प्राधान्य देताना जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून दिला जात आहे. नगराध्यक्षा व सर्व नगरसेवक शहराच्या विकासासाठी व जनतेच्या सेवेसाठी कटीबद्ध आहेत. सातत्याने विकास निधी उपलब्ध करून देत असल्याबद्दल आमदार निलेश राणे तसेच खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे यांचे उपनगराध्यक्ष दिपक पाटकर यांनी आभार व्यक्त केले.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

तरुण पिढीला सुसंस्कृतीशी जोडण्यासाठी भजन, कीर्तन आणि धार्मिक - सांस्कृतिक उपक्रम महत्त्वाची भूमिका बजावू शकतात : उद्योजक दत्ता सामंत

लोकप्रिय टॅग्स