ताज्या बातम्या
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप.
आंगणे कुटुंबीयांचे भाविकांना संयम व सहकार्याचे आवाहन.

आंगणे कुटुंबीयांचे भाविकांना संयम व सहकार्याचे आवाहन.

प्रकाशन: 21 Feb 2025 11:30 PM
वाचन संख्या 482

आंगणेवाडी वार्षिकोत्सव २०२५

मसुरे | प्रतिनिधी : नवसाला पावणाऱ्या आंगणेवाडी येथील श्री भराडी मातेच्या वार्षिकोत्सव २०२५ ला येणाऱ्या भाविकांचे आंगणे कुटुंबियांच्या वतीने स्वागत केले जात असून भाविकांनी सहकार्य करायचे आवाहन करण्यात आले आहे.

देवीचे दर्शन रांगेत घ्यावे, सर्व रांगांमधून देवीचे दर्शन व ओट्या स्वीकारण्याची व्यवस्था आहे, २२ फेब्रुवारी २०२५ रोजी पहाटे ३ ते रात्री ९.३० पर्यंत ओट्या भरण्यात येतील आणि रात्री ९.३० ते १२ धार्मिक विधी संपल्या नंतर पुन्हा ओट्या भरण्यात येतील अशी माहिती देण्यात आली आहे.

२३ फेब्रुवारी २०२५ रोजी सायंकाळी ५ वाजे पर्यंत ओटी भरणे व नवस फेडता येणार असून जत्रोत्सवात संयम व शिस्त पाळून सहकार्य करावे
असे आवाहन आंगणे कुटुंबीय, आंगणेवाडी यांच्यावतीने करण्यात आले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स